डॉ. बाबासाहेब यांचे कार्य भारतीय समाजासाठी दिशादर्शक – संजय भोसीकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची कार्य भारतीय समाजासाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे युवापिढीने त्यांचे विचार आत्मसात करून, पुढील वाटचाल करावी असे प्रतिपादन नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस संजय भोसीकर यांनी प्रियदर्शनी उच्च माध्यमिक विद्यालय कंधार येथील आयोजित अभिवादन सभेत बोलताना केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण संजय भोसीकर यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले. यावेळी प्राचार्य सौ. राजश्री शिंदे, हनुमंतराव पाटील पेठकर, प्रा. चंद्रकांत सोनटक्के, सौ. श्यामा पाटील, सौ.अंजली कुरूडे,प्रा. अनिल रावळे, प्रा. सत्यजित मलशेत्ते,प्राध्यापक वसंत गाडले, प्रा.संजय पाटील, प्रा.नारायण चव्हाण,अशोक कांबळे, सुनील पाटील, प्रवीण जोगे, मोहन तपासे, राजेंद्र नरंगले,मगदूम शेख, संभाजी नांदेड, निळकंठ चिरले, आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना संजय भोसीकर म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यांचे आयुष्य हजारो वर्षाच्या सामाजिक अन्यायग्रस्त शोषित गुलामगिरी भरलेले लोकांकरिता वेचले त्या काळात बहुजन समाजातील माणसांना उपेक्षित जीवन जगावे लागत होते या गुलामगिरीतून अज्ञानातून व अनिष्ट रूढी परंपरातून समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला हे करत असताना शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा असा मंत्र त्यांनी बहुजन समाजाला दिला शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो नवीन आव्हाने करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते तसेच शिक्षण हे समाज परिवर्तनाचे क्रांतीचे साधन आहे अशीही त्यांनी पटवून दिले व शिक्षणाचा प्रसार केला.

डॉ. बाबासाहेबांनी भारतीयसाठी जगातील सर्वात मोठी राज्यघटना लिहिली त्यामुळे भारतामध्ये सामाजिक समतेचि स्थापना होऊन सर्व जाती धर्मातील नागरिकांना सन्मानाने जगण्याचा अधिकार प्राप्त झाला. डॉ. आंबेडकर यांनी महिलांना घटनात्मक व समाजात पुरुषाबरोबर दर्जा मिळवण्यासाठी हिंदू कोड बिल सर्वात प्रथम सादर केले त्यामुळे समाजात आज महिला सन्मानाने जगू शकतात यामुळेच डॉक्टर बाबासाहेबांचे कार्य भारतीय समाजासाठी सदैव प्रेरणादायी व दिशादर्शक आहे असे संजय भोसीकर म्हणाले. यावेळी प्राचार्य सौ राजश्री शिंदे यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या जीवनावर प्रकाश टाकला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक चंद्रकांत सोनटक्के यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण जोगी यांनी केले

You may also like

Popular News