उध्दव ठाकरेनी केली रामभाऊंची अस्थेवाईक विचारपूस

काय रामभाऊ …काय म्हणते तबियत… ! अशी अस्थेवाईक विचारपूस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जेष्ठ कार्यकर्ते रामभाऊ चन्नावार यांची केली. निवडणुकीच्या धामधुमीत जुन्या… निष्ठावंत कार्यकर्त्यांशी थेट पक्षप्रमुखांनी संवाद साधला… हजारो उपस्थितांसाठी आणि स्वतः रामभाऊसाठी हा क्षण अविस्मरणीय ठरला.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे हिंगोली लोकसभा मतदार संघात आ. हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ हदगावला आले होते. सभेला गर्दी होती. व्यासपीठावर जुन्या.. निष्ठावंत व मोजक्याच नेत्यांची.. उपस्थिती होती. रामभाऊ चन्नावार ….हे नांदेड जिल्ह्यात जेव्हा शिवसेना स्थापन झाली पहिल्या पाच पैकी एक संस्थापक सदस्य थेट शिवसेना प्रमुखांशी त्या काळात मातोश्रीवर त्यांंचा राबता होता. लोहा कंधार शेकापच्या ‘एकहाती’ विधानसभा सतांतरात रामभाऊ चा मोठा सहभाग. माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या टीममध्ये विठ्ठल शेटकर, बालाजी नळगे, अशोक नळगे, रामभाऊ चन्नावार हे प्रमुख खेळाडू होते. जिल्ह्यात शिवसेनेच्या अनेकांनी पक्ष बदलला आ. सुभाष साबने, रामभाऊ अशी मंडळी पूर्वीपासून इथेच राहिले. आ. हेमंत पाटील यांच्या प्रचारात रामभाऊ चन्नावार व्यस्त आहेत. पासष्टी ओलांडलेले रामभाऊ पक्षासाठी जमेल तेवढे काम तन . मन . धनाने निष्ठेने करतात.

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे भाषण संपताच त्यांची द्रष्टी रामभाऊ चन्नावार यांच्यावर पडली काय रामभाऊ कशी काय तबियत म्हणत आस्थेवाईक जवळ जाऊन विचारपूस केली. हे सर्व द्रष्य हजारो उपस्थितांनी पाहिले. रामभाऊ भारावून गेले. पक्षप्रमुखांनी आपली विचारपूस केली हे पक्षनिष्ठेचे फळ होय…! काहीं जन ईथे राहून… तिथे ‘निष्ठा’ ठेवतात. मात्र या दौऱ्यात ‘बेदखल ‘होते. रामभाऊंंची केलेली विचारपूस अनेक निष्ठावंताना दिलासाच देणारी ठरली.

You may also like

Popular News