मुंबईकरांना यंदा जास्त पगारवाढीची अपेक्षा: शाईनडॉटकॉम

पहिले उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षण
२० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची मुंबईकरांना अपेक्षा

आर्थिक राजधानी मुंबईत काम करणा-या कर्मचा-यांना यंदा २० टक्के पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे तर तर त्या तुलनेत दिल्ली-एनसीआर आणि बंगळूर येथील कर्मचा-यांना त्यांच्या पगारात फक्त ०-१०% वाढ होईल असे वाटते आहे. शाईनडॉटकॉम या भारतातील दुस-या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या जॉब पोर्टलने अलीकडेच केलेल्या पहिल्यावहिल्या उमेदवार-केंद्री अप्रेझल सर्वेक्षणातून ही बाब स्पष्ट झाली आहे. एचआर किंवा कंपनीच्या दृष्टीकोनाऐवजी कर्मचा-यांच्या अपेक्षांवर केंद्रित हे सर्वेक्षण आयटी, बँकिंग आणि फायनान्स, औद्योगिक उत्पादने, शिक्षण/प्रशिक्षण, एफएमसीजी इ. सारख्या विविध उद्योगांतील व्यावसायिकांमध्ये करण्यात आले.

मुंबई, पुणे आणि चेन्नई यांसारख्या शहरात काम करणा-या व्यावसायिकांना २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा असल्याचे या सर्वेक्षणातून निदर्शनास आले आहे. मुंबईतील सुमारे ३७% लोकांना २०% पेक्षा जास्त पगार वाढीची अपेक्षा आहे, तर पुणे आणि चेन्नई येथील ही आकडेवारी अनुक्रमे ३६% आणि ३८% आहे. भारतातील सिलिकॉन व्हॅली म्हणजे बंगळूर येथे २१% लोकांना त्यांच्या पगारात १०% पर्यंत वाढ होईल असे वाटते आहे. तर देशाची राजधानी दिल्ली-एनसीआरमध्ये २०% लोकांना कमी पगारवाढ होईल असे वाटते आहे.

शाईनडॉटकॉमच्या सर्वेक्षणात निदर्शनास आलेली आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे, मुंबईतील शिक्षण / प्रशिक्षण क्षेत्रातील तब्बल ६२% कर्मचारी २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा करत आहेत तर ऑटो क्षेत्रातील सुमारे ५६% कर्मचा-यांनादेखील तितक्याच वाढीची अपेक्षा आहे. पुण्यातील ऑटो क्षेत्रातील ४८% आणि शिक्षण / प्रशिक्षण क्षेत्रातील ३८% कर्मचा-यांना २०% पेक्षा जास्त वाढीची अपेक्षा आहे. या दोन्ही शहरांमध्ये बहुतांशी क्षेत्रात दमदार वाढ होत आहे आणि एकत्रितरित्या त्यांचे अप्रेझल सेंटीमेंट देशात सर्वात जास्त आहे. पगारवाढीच्या अपेक्षांच्या क्षेत्रवार विश्लेषणातून हे स्पष्ट होते की, बीएफएसआय आणि बीपीओ/केपीओ /आयटीईएस क्षेत्रातील व्यावसायिकांमधील अप्रेझल सेंटीमेंट सर्वात उच्च आहे. या क्षेत्रातील ३५% पेक्षा जास्त कर्मचा-यांना २०% पेक्षा जास्त पगारवाढीची अपेक्षा आहे. तंत्रज्ञानामधील प्रगती आणि इंटिग्रेशनच्या जोरावर वृद्धिंगत होत असलेल्या या क्षेत्रांमध्ये इतक्या उच्च अपेक्षा असणे यात आश्चर्यकारक असे काहीच नाही.

या सर्वेक्षणाबद्दल बोलताना शाईनडॉटकॉमचे मुख्य कार्यकारी अधिकारी झाइरस मास्टर म्हणाले, “विविध मेट्रो शहरे आणि क्षेत्रे यांतील कर्मचार्यांेच्या अपेक्षांमध्ये अंतर आहे. बहुतांशी क्षेत्रातील कर्मचा-यांच्या अपेक्षा उच्च असल्या तरी, सर्वच संस्था काही या अपेक्षा पूर्ण करू शकणार नाहीत. शाईनडॉटकॉमवर आम्ही अप्रेझलच्या सत्रानंतर आम्ही आमच्या पोर्टलवर रोजगाराच्या शोधात असलेल्यांची सक्रिय उमेदवारांची संख्या वाढवण्यासाठी सिद्ध आहोत. नेहमीप्रमाणे, आम्ही त्यांना त्यांचे कौशल्य आणि अपेक्षा यानुरूप त्यांना नोकरी सुचवण्यासाठी सर्व प्रयत्न करू तसेच आमच्या शाईन लर्निंग प्लॅटफॉर्मद्वारे त्यांना त्यांचे कौशल्य वाढवण्यासाठी व दीर्घकालीन करियर ग्रोथसाठी सक्षम बनण्याची संधी देखील देऊ.”

या सर्वेक्षणात सामील झालेले प्रतिसादकर्ते प्रामुख्याने मुंबई (१९.४९%), दिल्ली-एनसीआर (२०.८९%), बंगळूर (२०.८९%), हैदराबाद (१६.४३%), पुणे (९.३४%) आणि चेन्नई (११.६४%) सारख्या महानगरांमधील होते. वर नमूद केलेल्या निरीक्षणांमधून हे स्पष्ट होते की, भविष्यात दीर्घ काळ श्रेष्ठ प्रतिभा सांभाळण्यासाठी संस्थांना आपल्याकडील मानव संसाधनावर अधिक गुंतवणूक करावी लागणार आहे.

You may also like

Popular News