भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 128 वी जयंती

नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात साजरी

भारतरत्न डॉ. भीमराव रामजी आंबेडकर यांची 128 वी जयंती नांदेड रेल्वे विभागीय कार्यालयात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री बी. विश्वनाथ ईर्या, अप्पर रेल्वे विभागीय व्यवस्थापक, नांदेड यांनी दीप प्रज्वलन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. सोबतच श्री विलास मुंगे, विभागीय सचिव, ऑल इंडिया एस.सी. एंड एस.टी. इम्पलोयीज असोसिएशन , नांदेड यांनी आणि इतर रेल्वे अधिकारी, कर्मचारी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून वंदन केले.

श्री विलास मुंगे, विभागीय सचिव ऑल इंडिया एस.सी. एंड एस.टी. इम्पलोयीज असोसिएशन , नांदेड यांनी आपल्या भाषणात डॉ. आंबेडकर यांच्या विषयी गौरवउदगार काढतांना त्यांनी देशासाठी केलेल्या विविध कार्याची माहिती दिली. ते म्हणाले कि डॉ. बाबासाहेब हे एका विशिष्ठ समाजाचे नेते नव्हते तर ते संपूर्ण देशाचे नेते होते. त्यांची ख्याती संपूर्ण जगभर पसरलि आहे. आज युनायटेड नेशन्स मध्ये पण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येते. 14 एप्रिल हा जागतिक ज्ञान दिन म्हणून संपूर्ण विश्वामध्ये साजरा करण्यात येतो.

श्री मुंगे म्हणाले कि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त संविधानाचेच विशेषज्ञ नव्हते तर ते एक उत्कृष अर्थशास्त्री होते, सामाजिक नेते होते, उत्कृष्ठ वक्ते होते, उत्कृष्ठ विधिज्ञ होते, एक दूर दृष्टी चे नेते होते. त्यांनीच महिला समानीकरण, कामगार कायदा, आधुनिकीकरण , शेती विषयक प्रगती, रुपयाचे महत्व आणि इतर अनेक महत्वाच्या विषयावर देशाला अमूल्य योगदान दिले. रिजर्व बेंक ऑफ इंडिया हि डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांचीच देन आहे. यावेळी बोलताना श्री मुंगे पुढे म्हणाले कि, आजच्या पिढीने डॉ. बाबासाहेब यांना जाणून घेतले पाहिजे, त्यांनी जी शेकडो पुस्तके लिहिली त्यांचे वचन केले पाहिजे, त्यांनी जे ज्ञान आत्मसात केले ते या पुस्तक मध्ये मांडले आहे ते आपण गृहन केले पाहिजे. आपण त्यांच्या एवढे महान तर बनू शकत नाही पण त्यांच्या विचारांवर तर नक्कीच चालू शकतो. त्यांनी माणसा-माणसा मधला भेद नष्ट करण्याकरिता आपले संपूर्ण आयुष्य वेचले, त्यांच्या मुळेच आजचा आदर्श समाज आपण निर्माण करू शकलो, आपण सर्व जाती-धर्माचे लोक आनंदाने या भारत देशात नांदत आहोत याची आपणास सदैव जान असली पाहिजे.

श्री यु. वेंकटेशवर्लू, विभागीय सचिव, सौथ सेन्ट्रल इम्प्लायीज संघ, नांदेड यांनी आपल्या भाषणात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना श्रद्धांजली अर्पण करतांना त्यांचा उल्लेख संपूर्ण पृथ्वीतळावरील महामानव असा केला. ते म्हणाले डॉ. आंबेडकर हे संपून मानव जातीचे नेते होते. त्यांनी भारतीय लोकांकरिता जा सुधारणा सुचविल्या त्या आज जग अंगीकारत आहे. ते म्हणाले कि आज ते डॉ. आंबेडकर यांच्या मुळेच सन्मानाने जगात आहेत, नाहीतर एखाद्या दुर्गम भागात मोल मजुरी करत होते. ते म्हणाले कि डॉ. आंबेडकरांनी ज्ञानालाच सर्वस्व मानले, त्यांनी जगभरातून विविध पदव्या संपादन केल्या. आपल्या द्यानाचा उपयोग त्यांनी मानव जातीच्या कल्याण करिता केला. आपणही त्यांनी दिलेल्या संधीचे सोने करून भरपूर ज्ञान प्राप्त करावे आणि त्याचा उपयोग समजा करिता कसा करता येईल ते पहावे.

श्री विश्वनाथ ईर्या, अप्पर विभागीय रेल्वे व्यवस्थापक, नांदेड यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. बाबासाहेब यांचा उल्लेख ज्ञानाचा आणि मानवतेचा जगत्गुरू असा केला. ते म्हणाले कि डॉ. बाबासाहेबांनी जे ज्ञान प्राप्त केले त्याने ते हुरळून गेले नाहीत तर त्यावेळी समाजात जो शोषित / पिडीत होते त्यांना सन्मानाने जगता यावे म्हणून त्यांनी आपले संपूर्ण जीवन अर्पण केले. आज त्यांच्या मुळेच कोरोडो लोक सन्मानाने जीवन जगात आहेत. असे कार्य जगात कुणीही केलेले नाही. श्री ईर्या म्हणाले कि कृषी, अर्थ, पाणीपुरवठा, समाजकारण, राजकारण, समानता, एकता, अशा विविध क्षेत्रात डॉ. बाबासाहेबांनी लाखमोलाचे योगदान दिले. त्यांचे आपण सदैव ऋणी आहोत. श्री अब्दुल मतीन , वरिष्ठ राजभाषा अधिकारी, नांदेड यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले. तर श्री के. येटय्या, विभागीय कार्मिक अधिकारी , नांदेड यांनी आभार प्रदर्शन केले.

You may also like

Popular News