स्वारातीम विद्यापीठांतर्गत १८ एप्रिल रोजीचे पेपर ८ मेला

स्‍वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमाच्या उन्हाळी-२०१९ परीक्षा सध्या सुरु आहेत. दि.१८ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ असल्यामुळे सदरील दिवशीचे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. सदरील दिवशी होणारे सर्व पेपर दि.८ मे २०१९ रोजी होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

विद्यापीठ परीक्षेत्रामध्ये दि.१८ एप्रिल २०१९ रोजी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक २०१९ असल्यामुळे या दिवशीचे बी.ए. (द्वितीय आणि चौथे सत्र) आणि बी.एस्सी. (द्वितीय आणि चौथे सत्र) अभ्यासक्रमाचे सर्व पेपरची परीक्षा पुढे ढकलण्यातआली असून सदरील दिवशीचे सर्व पेपर दि.८ मे २०१९ रोजी घेण्यात येणार आहेत. सदरील बद्दलाची संबंधित विद्यार्थी, प्राध्यापकांनी नोंद घ्यावी. तसेच अधिक माहितीसाठी संबंधितांनी विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

You may also like

Popular News