5 वर्षात जिल्ह्यातील खासदार संसदेत रेल्वे प्रश्नावर बोललेच नाहीत – रेल्वेमंत्री पियुष गोयल

आधुनिक देश विकसीत देशाची संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सबका साथ सबका विकास साधत आज भारत देश मागील पाच वर्षात सात करोड सर्व सामण्य लोकांना उज्वला गॅसची योजनांचा लाभ मिळवून दिला, शेतकऱ्याना प्रती वर्षी सहा हजार रूपयांची योजना राबवली, आरोग्य योजना, जनधन योजना, महाराष्ट्रात कोठेही रेल्वेची कॅर्सीग होवू नये म्हणून रेल्वेचे दुहेरी करण करण्यात आले. ज्याच कोणी पक्षातच ऐकत नाही म्हणणारे यांना संसद भवनात मी कधीही पाहिले नाही, आदर्श सासंद पाहिले नाही, महाराष्ट्रात मागच्या वेळेस दोनच खासदार निवडून आले त्यापैकी दुसरा तर निवडनूकीला उभ राहण्याची हिम्मत झाली नाही,आणि जो उभा आहे. तो ऐतिहासिक मताने पराभूत होईल आसा टोला आशोक चव्हाण याचे नाव न घेता लगावला.

देशात व राज्यात डबल इंजीन चे काम चालू आहे. एकीकडे देशात नरेंद्र मोदी, तर राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने भरीव अशी कामे केली आहे म्हणून हा विकास अखंडित चालु राहण्यासाठी महायुती च्या उमेदवाराला निवडून द्या आसे आव्हान रेल्वे मंत्री पियुष गोयल यानी भाजप -शिवसेना महायुती चे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारार्थ बोलताना व्यक्त केले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, राज्याचे कामगार मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर, प्रवीन पाटील चिखलीकर, लक्षमण ठक्करवाड, राजेश पवार, पूनमताई पवार, मिनलताई खतगावकर, बालाजी बच्चेवार, श्रावन पाटील भिलवंडे, माणिकराव लोहगावे, गणेशराव पाटील करखेलीकर, राजीव गंदीगुडे जयराम कदम बाभळीकर, नांदेडचे माजी महापौर सुरजीतसिग गिल, मोगला गैड, रमेशचंद्र तिवारी, रविंद्र पोतगंटीवार, भाजप तालुका अध्यक्ष विजय पाटिल डांगे, शिवसेना तालुका प्रमुख आकाश रेड्डी येताळकर, रिपाईचे तालूका अध्यक्ष प्रभाकर भामणे, शिवसेनेचे संघटक गणेशजी गिरी, राजु शिरामणे, बालाजी ढगे, साहेबराव शिंदे, रामेश्वर गंदलवार, आदिची उपस्थित होती.

पूढे बोलतांना रेल्वे मंत्री पियुष गोयल म्हणाले, नांदेड लोकसभा मतदार संघातील रेल्वेच्या बाबतीत एव्हढ्या मोठया समस्यां आस्तनांनाही जिल्ह्यातील खासदारांनि या बाबतीत 5 वर्षे संसदेत कधीही या बाबतीत तोंड उघडले नाही म्हणून हा विषय सरकार च्या लक्षात आला नाही असेही ते म्हणाले विना अपघात व सुरक्षित सेवा असे ब्रीद घेऊन रेल्वेच्या विभागाचे काम अतिशय उत्कृष्ट चालत आहे. महाराष्ट्रतून जास्ती जास्त खासदार निवडून आले पाहिजे. आपले मतदान हे आमूल्य मतदान आहे . आपल्या हक्काच्या उमेदवाराला संसद भवनात पाठवून मतदार संघाचा विकास करून घ्या आपले या भागाचे ज्वलंत प्रश्न रेल्वेच्या ओवर ब्रिजचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल आसे यावेळी बोलताना व्यक्त केल

You may also like

Popular News