बालविकास अधिकारी आपल्या सहकाऱ्यासह अडकला लाचेच्या जाळ्यात

एका खाजगी संस्थेच्या बालगृच्या अनाथ ,निराधार,निराशीत बालकल्याण सह्ययक अनुदान प्रलंबित बिलाचे धनादेश देण्यासाठी नांदेड जिल्हा परिषेदेचे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी धर्मपाल पोतना शाहू यांना तक्रारधारा कडून 25000 हजार रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आले.

या बाबद अधिक माहिती अशी की तक्रार दार व त्यांचे दोन सहकारी संस्था चालक यांच्या 5 संस्थाच्या बालरगृहारातील अनाथ ,निराधार, निराशीत बालकल्याण सह्याकया अनुदान जिल्हा महिला व बालविकास विभागाकडे प्रलंबित आहे. हे अनुधन मिळावे यासाठी संस्थाचालकानि संबधीत अधिकाऱ्याकडे पाठपुरावा केला होता. यासाठी 25000 हजार रुपये ची मागणी केली होती. याबाबद तक्रार दारांनी लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडे लेखी तक्रार दिली होती. यानुसार विभागाचे पोलीस उपअधीक्षक विजयडोंगरे यांच्या पथकांनी सापळा रचला. या विभागाचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब काकडे यांनी जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी धर्मपाल शाहू व त्यांच्या शासकीय गाडीचा वाहनचालक ज्ञानोबा सूर्यवंशी यांनी 25000 हजार रुपये ची लाच घेताना दिनांक 15 रोज सोमवारी दुपारी यांच्या शासकीय कार्यलयत ही कार्यवाही करण्यात आली. यांच्या विरुद्ध वजीराबद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

You may also like

Popular News