बॅ. ओवेसी व एड. बाळासाहेब आंबेडकर मंगळवारी नांदेडमध्ये धडाडणार

वंचीत बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांच्या प्रचारार्थ मंगळवार दि 16 एप्रिल रोजी आयएमआयएम चे अध्यक्ष बॅ . खा. अससुद्दीन ओवेसी आणि ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांची संयुक्त सभा होणार असल्याची माहिती एमआयएम चे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला यांनी प्रासिध्दीपत्राद्वारे दिली आहे.

नांदेड लोकसभा मतदार संघात कॉंग्रेस वभाजप समोर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांच्या रूपाने सक्षम पर्याय उभा राहिला,असून जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची मोठी लाट दलित,मुस्लिम,धनगर व लहान वंचित जात समूहात निर्माण झाली आहे. एकीची वज्रमूठ आवळली. कॉंग्रेस व भाजप या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्ही पक्षाकडून वंचित समाजाला विकासापासून वंचित ठेवण्यात आले. या समाजाचा दोन्ही पक्षांनी केवळ सत्ता लाटण्यासाठीच उपयोग केला. वंचिताना सत्तेस वाटा दिला नाही. वंचितांचा सत्तेतील वाटा मिळविण्यासाठी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी महाराष्ट्रात वंचित बहुजन आघाडी स्थापन केली.नांदेडमध्ये वंचित बहुजन आघाडी एम आय युतीचे उमेदवार प्रा. यशपाल भिंगे यांनीही प्रचारात आघाडी मिळविली आहे . नांदेडमध्ये विजय मिळविण्यासाठी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड. बाळासाहेब आंबेडकर, एमआयएमचे अध्यक्ष बॅरिस्टर खासदार असदुद्दीन ओवेसी यांची संयुक्त जाहीर सभा आज दि.16 एप्रिल रोजी दुपारी एक वाजता देगलूर नाका भागातील हैदरबाग रोड मज्जित जवळ होणार आहे. या वेळी एमआयएमचे आमदार एम्तियाज जलील, अण्णाराव पाटील, प्राध्यापक यशपाल भिंगे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती राहणार आहे .या जाहीर सभेला लाखोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन एमआयएमचे मराठवाडा अध्यक्ष फेरोज लाला ,वंचित बहुजन आघाडीचे शिवाजी गेडेवाड ,जिल्हा अध्यक्ष डॉक्टर संघरत्न कुऱ्हे , राहुल प्रधान, कॉ. फारूख अहमद ,जफर अली खान,इजि.प्रशांत इंगोले आदींनी केले आहे

You may also like

Popular News