फिल्टरच्या पाण्यामुळे माठ व्यवसाय अडचणीत

जारच्या पाण्याने केली गरिबांच्या फ्रीजवर मात

ग्रामीण भागात जाणवणारी पाणी टंचाई तसेच दूषित पाण्यापासून होणारे आजार टाळण्यासाठी नागरिक बाटली बंद किंवा पिण्याच्या पाण्यासाठी सर्रास जारच्या पाण्याला अधिक पसंती देताना दिसत आहेत. त्यामुळे परिसरातील गावागावात पारंपारिक माठ विक्रीच्या व्यवसायावर मंदीचे सावट पसरले आहे. कमी पैशात सहज गत्या शुद्ध पाणी मिळते, शिवाय ते थंड करण्यासाठी घरातील फ्रीज चा मार्ग मोकळा असल्याने आज घडीला गरिबांचा फ्रीज समजला जाणारा माठाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचे दिसुन येते.

उस्माननगर येथील कुंभार गल्लीत पिढ्यान् पिढ्या पारंपारिक पद्धतीने फिरत्या चाकावर तयार केले जातात. हे माठ बाजारात विक्रीसाठी आणले जातात, मात्र मागील अनेक वर्षापासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झाल्याने व्यवसायावर विरजण पडले होते. चिखल निर्माण करण्यासाठी पाणी अत्यावश्यक लागते. चिखल तयार करण्यासाठी पाणी वेळेवर मिळत नसल्यामुळे पाणी विकत घेणे परवडत नसल्यामुळे व्यवसाय मंदावला.

मागील काही वर्षापासून माठाच्या मागणीत घट होत असल्याचे दिसून येत आहे. दिवसाला केवळ पाच ते दहा माठाची विक्री होते. सध्या विविध इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या सवलतीच्या दरात फ्रिज तसेच संबंधित इलेक्ट्रॉनिक्स वस्तू उपलब्ध करून देत असल्याने नागरिकांचा कल या आधुनिक वस्तूकडे अधिक प्रमाणात वाढ होत असताना दिसत आहे. शिवाय उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत. त्यामुळे पाण्याच्या जारला मागणी वाढत आहे. काळानुसार या व्यवसायालाही चार चांद लागल्याचे दिसून येत आहे, सुमारे दहा ते पंधरा ठिकाणे पाणी शुद्ध करून ते जार मध्ये भरून मिळते वीस लिटर शुद्ध पाणी अवघ्या दहा ते वीस रुपयांना घरपोच मिळते. त्यामुळे प्रत्येकाच्या घरात माठा ऐवजी जाणारच दिसून येत आहेत शिवाय घरोघरी शुद्ध पाण्यासाठी वाटर फिल्टर बसवलेले आहेत. पूर्वी दीडशे रुपयांना मिळणारा माठ नागरिक दोन वर्ष वापरत होते. मात्र सध्या रोध पाण्यासाठी जास्त खर्च करण्याची तयारी नागरिकांची असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम माठ विक्री व्यवसायावर झाला आहे. माठाला मागणी कमी होत असून व्यवसायावर मंदीचे सावट दिसून येत आहे.

पूर्वी पहाटे उठून गाढवावर माती आणून तिला बारीक करून दुपारच्या वेळेस चिखल तोडून चाकावर माठ बनवायचे व नंतर उन्हात भाजून खडक ते अव्या मध्ये टाकून तीन दिवस भरून ठेवायचे व विक्रीसाठी, पूर्वी बारा महिने आमचा माठ विक्रीचा व्यवसाय चालत असे, मात्र बदलत्या काळानुसार माठाची जागा पाण्याच्या जारणे व फ्रिज ने घेतली आहे आता उन्हाळ्यात देखील पाच ते दहा माठाची विक्री होत आहे परिणामी आमचा व्यवसाय अडचणीत सापडला आहे त्यामुळे उपासमार होत आहे… किशन टिमकेकर (माठ कारागिर) उस्माननगर

You may also like

Popular News