दामिनी पथकाने वाचवले युवकाला

आज सायंकाळी 6 वाजता बाबानगर टी – पॉईंटवर गाडीवर पळवून नेतांना दामिनी पथकाने त्या युवकाची सुटका केली.

आज सर्वत्र पोलीस बंदोबस्त हजर असतांना बाबानगर टी पॉईंटवरून एम.एच.26 यु 3073 या मोटारसायकलवर एका युवकाला मध्ये बसवून घेऊन जात असतांना तो मला वाचवा वाचवा असे ओरडत होता तेंव्हा दामिनी पथकाच्या प्रमुख पोलीस उपनिरिक्षक शितल चव्हाण, पोलीस हवालदार शिंदे, दंतापल्ले आणि शोभा कदम यांनी या युवकांना पकडण्यासाठी पुढे गेले तेंव्हा पळवून नेणारे दोन युवक पळून गेले. दामिनी पथकाने वाचविलेल्या युवकाने पोलीस ठाणे शिवाजीनगर येथे काय तक्रार दिली याची माहिती मिळू शकली नाही. मारहाण करणाऱ्या युवकांपैकी एकाचे नाव अर्जुन लाला असे होते अशी माहिती प्राप्त झाली आहे. त्याविरुध्द अनेक गुन्हे प्रलंबित आहेत असेही सांगण्यात आले.

You may also like

Popular News