BREAKING NEWS

logo

नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील कलम २८(२) नुसार अधिसभेचे गठन करावयाचे चालू आहे. व्यवस्थापन, प्राचार्य, अध्यापक आणि विद्यापीठ अध्यापक यांच्यामधून अधिसभेवर निवडून द्यावयाच्या सदस्यांसाठी निर्वाचन गण तयार करण्यात येत असून, आवश्यक ती सर्व माहिती विहित केलेल्या नमुन्यात भरून आवश्यक असलेले सर्व दस्तऐवज जोडून विद्यापीठात ५ जुलैपर्यंत सादर करावयाचे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले होते. पण प्राचार्य, अध्यापक यांच्या मुदतवाढ देण्याच्या मागणीचा सकारात्मक विचार करून मंगळवार, दि.११ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचे विद्यापीठाचे प्र.कुलसचिव डॉ.आर.एम. मुलाणी यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न, स्वायत्त महाविद्यालय तसेच मान्यताप्राप्त परिसंस्थांच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सचिव, प्राचार्य, संचालक यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदीनुसार आवश्यक ती सर्व माहिती विहित प्रपत्रात व आवश्यक त्या कागदपत्रासह कुलसचिव कार्यालयात मंगळवार, दि.११ जुलै रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सादर करावी तसेच अधिक माहितीकरीता विद्यापीठ संकेतस्थळाला भेट द्यावी, असे विद्यापीठाच्या वतीने कळविण्यात आले आहे.  

    Tags