BREAKING NEWS

logo

नांदेड, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी सर्व जनतेस कळविण्यात येते की, दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची 97 वी जयंती भव्यदिव्य स्वरूपात साजरी करण्याच्या निमित्ताने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारक नवा मोंढा चौक नांदेड येथे रविवार, दि. 9 जुलै 2017 रोजी सायंकाळी 4 वाजता विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

या बैठकीचे मार्गदर्शक समाजभूषण शंकरराव वाघमारे, ऍड. शिवराज कोळीकर, सुरेशराव मरपल्लीकर, ऍड. बी.एम. गायकवाड, ईश्वरराव जाधव, प्रा. संतोष भुयारे, संजय वाघमारे, अप्पू वाघमारे, शशिकांत तादलापूरकर, भारत खडसे, राजू चव्हाण इत्यादींची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. यामध्ये जिल्हा जयंती मंडळाची कार्यकारिणी निवडण्यात येणार आहे. तरी संपूर्ण नांदेड जिल्ह्याचे प्रमुख कार्यकर्ते व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रेमी जनतेने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

    Tags