BREAKING NEWS

logo

अर्धापूर, अर्धापूरच्या शंकरराव चव्हाण महाविद्यालयात डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त आरोग्य शिबीर, रक्तदान, संशोधक प्राध्यापक व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, भित्तीपत्रकांचे विमोचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 

दि. 11 जुलै रोजी आरोग्य तपासणी शिबीर तर 13 जुलै रोजी सकाळी 9 वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य शिबिरासाठी डॉ. के.पी. गायकवाड, डॉ. आनंद जाधव, डॉ. गायत्री वानखेडे, डॉ. पल्लवी लंगडे यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. दि. 14 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता शंकरराव चव्हाण यांचे जीवन व कार्य या विषयावर निवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव कपाळे यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.जी. जाधव राहणार आहेत. या कार्यक्रमाचा लाभ विद्यार्थी, पालक व नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

    Tags