logo

नांदेड, रविवार दि. ७  जुलै रोजी भदन्त पंय्याबोधी यांच्या आठव्या वर्षावासाची सुरूवात झाली आहे. आषाढ पौर्णिमेपासून ते आश्विन पौर्णिमेपर्यंत भारतातीलच नव्हे तर जगातील सर्व बौध्द भिक्खुंचा वर्षावास असतो. पाण्यापावसामध्ये भिक्खु पूर्वी पायी-पायी पिरून धम्माचा प्रचार-प्रसार करत असत. कधी-कधी भर पाऊस झाल्यामुळे नदी-नाल्यांना भरपूर पुर यायचा. काही भिक्खु वाहुनही जायचे. तसेच धम्म प्रचार-प्रसार करत असताना कांही छोटे-छोटे जिवजंतू पायाखाली येऊन मरण पावायचे. हि गोष्ट जेंव्हा भगवान बुध्दांना कळाली तेंव्हा भिक्खुंना आदेश दिला. कि, भिक्खंनो वर्षावास काळामध्ये तीन महिने एका ठिकाणावर राहून वर्षावास करावा. वर्षा म्हणजे पाऊस, वास म्हणजे राहणे. तेेंव्हापासून भिक्खुंचा वर्षावास सुरू होतो. या काळामध्ये उपासक-उपासिकांनाही त्याचा लाभ होतो. 

हर्षनगर येथील संबोधी बुध्द विहार व डॉ. आंबेडकर नगर येथील त्रिरत्न बुध्द विहारात या वर्षावास काळामध्ये ध्यान, आनापान, बुध्द आणि त्यांचा धम्म ग्रंथाचे वाचन तसेच धम्मज्ञान चाचणी असा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. या तीन महिन्याच्या कालावधीमध्ये श्रध्दावान उपासक उपासीकांनी शुभ्रवस्र परिधान करून बुध्द विहारात उपस्थित राहून धम्मदेसनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सुजाता महिला मंडळ व पंचशिल महिला मंडळ हर्षनगर यांनी केले आहे.

    Tags