logo

नांदेड, अवघ्या काही दिवसांवर महानगरपालिका निवडणुक ठेपली असल्याने सर्वच राजकीय पक्षांनी दंड थोटपले आहेत. कॉंग्रेस पक्षाने या निवडणुकीची तयारी गेल्या अनेक महिन्यांपासून केली असून त्या पाठोपाठ भाजपाने आता शिवसेनेनेही बॅंकेच्या सभागृहात केली आहे.

महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेकडून प्राथमिक बैठक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात आ. प्रताप पा. चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली आ. हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख भुजंग पाटील, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली. या बैठकीला मनपा विरोधी पक्षनेत्यासह सर्व नगरसेवकांची उपस्थिती यावेळी होती. आगामी महापालिका निवडणुकीची रणनिती ठरविण्यासाठी शिवसेनेकडून आता जोरदार तयारी सुरू केली आहे. या बैठकीत भाजपसोबत युती करायची की नाही या संदर्भात चर्चा करण्यात आली. शिवसेनेनी भाजपशी युती करण्याची सहमती दर्शविली आहे पण सर्व नगरसेवकांचा सल्ला घेऊन युती केली जाणार आहे. युती करत असताना सेना-भाजपचे असणारे विद्यमान नगरसेवक यांच्या जागा त्या-त्या पक्षाकडे राहतील असा निर्णय प्राथमिक स्तरावर झाला आहे तर नवीन जागेवर जागेवाटपा संदर्भात चर्चा करण्यात येईन, असेही सांगण्यात आले. मात्र महानगरपालिका निवडणुकची प्राथमिक बैठक जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या सभागृहात घेण्यात आल्याने अनेकांना आश्यर्चाचा धक्का बसता. मनपाच्या निवडणुकीची चर्चा बॅंकेच्या सभागृहात पण महानगराध्यक्ष महेश खोमणे हे मात्र या बैठकीत दिसून आले नाहीत यामुळे महानगराध्यक्षाच्याच गैरहजेरीमध्ये ही बैठक घेण्यात आल्याने शिवसेनेतील अनेकांनी नाराजी व्यक्त केली.

    Tags