logo

नांदेड, शिवसेनेने पुकारलेल्या राज्यभरातील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर पुकारलेल्या ढोल वाजवो आंदोलनानिमित्त जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर ढोल वाजवो आंदोलन करून भाजप सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असून शेतकऱ्यांच्या हिताचा नसल्याचा आरोप यावेळी शिवसेनेचे आ. हेमंत पाटील यांनी केला.

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या मुख्य कार्यालयासमोर दि. 10 रोज सोमवारी सकाळी 11 वाजता ढोल वाजवो आंदोलन करण्यात आले. यावेळी आ. हेमंत पाटील, जिल्हाप्रमुख मिलिंद देशमुख, भुजंग पाटील, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, मनोज भंडारी, उमेश मुंडे, युवासेना जिल्हाधिकारी महेश खेडकर, माधव पावडे, मनपा विरोधी पक्षनेते प्रमोद खेडकर, नगरसेवक तुलजेश यादव, बालाजी कल्याणकर, विनय गुर्रम, अशोक उमरेकर, महिला आघाडीच्या निकीता शहापूरवाड, दिपाली उदावंत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते. भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला असून अद्यापही याचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला नाही यामुळे शिवसेनेच्यावतीने हे आंदोलन पुकारले असून त्याच अनुषंगाने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसमोर ढोल वाजवो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्यावतीने मागण्यांचे निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी अजय कदम व अध्यक्ष आ. प्रताप पाटील चिखलीकर यांना देण्यात आले.

    Tags