logo

नांदेड, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये चालू शैक्षणिक वर्षांपासून पदवी अभ्यासक्रमास सिबीसीएस पॅटर्न लागू करण्यात आला आहे. यामध्ये कोणत्याही शाखेतील विद्यार्थ्यांना इत्तर शाखेतील विषय निवडीचे स्वातंत्र्य असणार आहे. 

यानुसार चालू शैक्षणिक वर्षांपासून बी.ए. आणि बी.एस्सी. या अभ्यासक्रमाकरीता प्रत्येक ऐच्छिक विषयासाठी प्रथम व द्वितीय वर्षासाठी प्रत्येकी दोन व तृतीय वर्षासाठी तीन पेपर आहेत. बी.ए. व बी.एस्सी. मधील प्रत्येक ऐच्छिक विषयाची दोन पेपरची परीक्षा एकत्रीत घेण्यात येणार आहे. दोन्ही पेपरसाठी एकच प्रश्नपत्रिका असणार आहे. यासाठी तीन तासाचा कालावधी असेल. त्यापैकी अर्धा तास एमसीक्यू (बहुपर्यायी प्रश्न पत्रिका) साठी आणि उरलेले अडीच तास थेअरी पेपरसाठी असणार आहेत. एमसीक्यूच्या दोन्ही पेपरसाठी स्वतंत्र ओएमआर शीट व थेअरीच्या दोन पेपरसाठी स्वतंत्र उत्तरपुस्तिका देण्यात येणार आहे. परीक्षेच्यावेळी सर्व परीक्षार्थ्यांनी पहिल्या अर्ध्यातासामध्ये एमसीक्यू सोडवावी लागेल त्यानंतर उरलेल्या वेळेमध्ये थेअरी पेपर लिहावा लागेल. यानिर्णयाची अंमलबजावणी येणाऱ्या हिवाळी सत्राच्या परीक्षेपासून होणार आहे आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने तृतीय वर्षापर्यंत राबविण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवि सरोदे यांनी कळविले आहे.        

    Tags