logo

नांदेड (एनएनएल) अर्धापूर वळण रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याचे आदेश मुंबई येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे दक्षता गुणनियंत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता चमलवार यांच्याकडे सोपविली होती. पण चमलवार संशयाच्या भोवऱ्यात अडकताच या कामाची फेरतपासण्या करण्याच्या सुचना नाशिक येथील अधीक्षक अभियंता एस.एस. पाटील यांना दिल्यावरून त्यांनी गुरूवारी अर्धापूर वळण रस्त्याची पाहणी केली.

दि. 8 जुलैच्या नांदेड न्यूज लाईव्हने माजी अधिकाऱ्याच्या पुत्राची चौकशी चमलवार करणार काय ? या मथळ्याखाली बातमी प्रकाशीत झाली होती. या बातमीची दखल घेऊन राज्य सचिवांनी अधीक्षक अभियंता पाटील यांना फेरतपासणीसाठी पाठविले होते. नांदेड-हिंगोली राज्य महामार्गावरील अर्धापूर वळण रस्त्याचे काम 2011 मध्ये 6 कि.मी. अंतराचे काम हाती घेण्यात आले. या कामावर केंद्र शासनाच्या निधीतून तब्बल 23 कोटी रूपये खर्च करण्यात आले. हे काम सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी अधिकारी जळकोटे यांच्या पुत्राने केल्याने व चौकशीसाठी आलेले अधीक्षक अभियंता चमलवार हे जळकोटे यांच्या हाताखाली काम केले असल्यामुळे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या पुत्राची चौकशी ते निपक्षपातीपणे करतील की नाही असा संशय निर्माण होताच तात्काळ दि. 13 रोज गुरूवारी नाशिक येथील  दक्षता व गुणनियंत्रण पथकाचे अधीक्षक अभियंता एस.एस. पाटील यांना फेर तपासणीसाठी नांदेड येथे पाठविण्यात आले. पाटील यांनी झालेल्या कामाची सखोल चौकशी करून त्यांनी 6 कि.मी. अंतरात 18 ठिकाणी त्यांनी चाचणी घेऊन व रस्त्याचे खोदकाम करून नमुने गोळा केले. त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीत अनेक ठिकाणी त्यांना निकृष्ट दर्जाचे साहित्य वापरण्यात आल्याचे आढळून आले आहे. यावेळी त्यांच्यासोबत या भागाचे जि.प. सदस्य बबन बारसे, ऍड. किशोर देशमुख, शिवराज जाधव, पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष ओमप्रकाश पत्रे, उदय गुंजकर यांच्यासह आदींची यावेळी उपस्थिती होती.

    Tags