logo

BREAKING NEWS

अर्धापूरात जुगार अड्‌ड्यावर धाड; साडे चार लाखांचा ऐवज जप्त

नांदेड, स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने येथील नवी आबादी भागात धाड टाकून जुगार खेळणाऱ्या  पाच आरोपीला ताब्यात घेऊन साडे चार लाखांचा मुद्देमाल जप्त केला.

नवी आबादी भागात 10 मे च्या पहाटे 2.30 च्या सुमारास जुगार अड्‌ड्यावर धाड टाकून रोख 3 हजार 270 रूपये, चार मोटारसायकल, 6 मोबाईल, पत्ते असा एकूण 4 लाख 63 हजार 70 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी जुगार खेळणारे जुबेर नशीरोद्दीन काजी, फयुमोद्दीन अब्दुल लतीफ, अ. खदीर अ. मजीद, आवेश काजी जकीओद्दीन व शे. सादेक शे. कासम या पाच आरोपीनां  गजाआड करण्यात आले आहे.

    Tags