logo

नांदेड, अर्धापुरचा एमआयएम पक्षाचा नगरसेवक रेती चोरी प्रकरणात आज न्यायालयीन कोठडीत भाग्यनगर पोलिसांनी पाठविला. तर नांदेड ग्रामीण पोलिसांनी पकडलेल्या दोन रेती चोरांना प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी महेंद्र सोरते यांनी  तीन दिवस पोलीस कोठडीत पाठविले आहे.

काल दि.11 मे रोजी दुपारी कौठा परिसरातून चारचाकी वाहन क्र.एमएच-22-एन-2383 मध्ये एक ब्रास वाळू चोरुन घेवून जात असताना सापडली. याबाबत पोलीस कर्मचारी शिवाजी कानगुले यांनी दिलेल्या तक्रारीवरुन नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गाडी चालक शेख निसार शेख गफूर आणि गाडी मालक पप्पू मोरे या दोघांविरुध्द भारतीय दंड विधानाच्या चोरी या सदराखाली आणि रेतीची चोरी केली म्हणून गौण खनिज कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक सुनिल निकाळजे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस उपनिरीक्षक एम.बी.राठोड यांच्याकडे तपास देण्यात आला. 

एम.बी.राठोड आणि त्यांचे सहकारी पोलीस कर्मचारी विनोद मामुलवार यांनी शेख निसार आणि पप्पू मोरे या दोघांना न्यायालयात हजर करुन तपासासाठी पोलीस कोठडी मागितली. सरकारी वकील ऍड.श्रीकांत भोजने यांनी न्यायालयाला पोलीस कोठडी का आवश्यक आहे हे पटवून सांगितले. न्यायाधीश महेंद्र सोरते यांनी शेख निसार आणि पप्पू मोरेला तीन दिवस अर्थात 15 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्याचे आदेश जारी केले आहेत.

    Tags