LOGO

भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह पाच जणांना तीन दिवसाची पोलीस कोठडी

रामप्रसाद खंडेलवाल - 2017-05-15 20:23:49 - 3945

नांदेड, काल सायंकाळी झालेल्या भांडणातील भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्यांसह पाच जणांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी 18 मे 2017 पर्यंत पोलीस कोठडीत पाठविण्यात आले आहे. 

नांदेड शहरातील कैलासनगर भागात शैलेंद्र फुलसिंग ठाकूर यांची स्वास्तीक एजन्सी नावाची इनव्हर्टरची दुकान आहे. शैलेंद्र ठाकूर हे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत. अगोदर ते पदाधिकारीपण होते. नांदेड शहरात भारतीय जनता पार्टीचे सध्या पदाधिकारी असलेले वैभव भिमराव खांडेकर यांच्यात आणि ठाकूरमध्ये वाद सुरू होते. त्या वादाची परिवर्तन वादात यापुर्वीही अनेक वेळा झाले. काल 14 मे रोजी सायंकाळी 7 वाजता वैभव खांडेकरने फोनकरून शैलेंद्र ठाकूरला शिवीगाळ केली. त्यानंतर 7 वाजेच्या काही वेळेनंतर वैभव खांडेकर व त्यांचे इतर मित्र एका चारचाकी गाडी क्रमांक एम.एच.04 सी.ए.02 या गाडीत बसून आले आणि तु मला सोडून पक्षाचे काम कस काय करतोस असे सांगून त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला. त्यांच्यासोबत सोनु कल्याणकर या त्याच्या मित्रालाही मारहाण झाली. शैलेंद्र ठाकूर यांचा आणखी एकमित्र धम्मा कांबळे यालाही मार लागला. या सर्व प्रकाराची गडबड सुरू असतांना वैभव खांडेकर आणि त्याच्या मित्रांनी  शैलेंद्र ठाकूर यांच्या दुकानाची मोठी  नासधुस केली असल्याची तक्रार शैलेंद्र ठाकूर यांनी दिली. यावरुन भाग्यनगर पोलीसांनी भारतीय दंड विधानाची कलम 307 आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

या प्रकारणाचा तपास पोलीस निरिक्षक प्रशांत देशपांडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरिक्षक भाऊसाहेब खंदारे यांच्याकडे होता. त्यांनी पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड, राजू कांबळे, हणमंत कल्लाळ, रितेश कुलथे आणि बालाजी सातपुते यांनी मिळवून वैभव भिमराव खांडेकर (वय-31), मनोज उर्फ पप्पु अशोक कांबळे (वय-26), स्वप्नील पिराजी फुले (वय-27), वैभव शंकरराव पांढरे (वय-20) आणि विशाल शंकरराव पांढरे (वय-25) या पाच जणांना अटक केली. आज दिनांक 15 मे 2017 रोजी दुपारी पकडलेल्या पाच जणांना तिसऱ्या प्रथमवर्ग न्यायादंडाधिकारी न्यायालयात हजर केले. राजकारणातून घडलेले भांडण असले तरी तपासासाठी पोलीस कोठडी देणे आवश्यक असल्याचा मुदा सरकारी वकील ऍड. आशीष देशपांडे यांनी मांडला. आरोपीच्यावतीने पोलीस कोठडी देणे आवश्यक नसल्याची बाब मांडण्यात आली. युक्तीवाद ऐकून तिसऱ्या प्रथम न्यायदंडाधिकाऱ्यांनी पाच ही जणांना 18 मे पर्यंत पोलीस कोठडीत पाठविले आहे. 

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top