logo

नांदेड, शहरातील विविध भागातील नालीसफाई व अकरा सखोल भागाची पाहणी करुन पावसाळ्याच्या अगोदर संपूर्ण नालीसफाई करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सर्व विभागप्रमुख आणि कर्मचाऱ्यांची बैठक रत्नाकर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली दि.16 रोज मंगळवारी महापालिकेच्या सभागृहात पार पडली. 

महानगरपालिकेने पावसाळ्याच्या आगोदरची पुर्वतयारीसाठी बैठकीचे आयोजन उपायुक्त रत्नाकर वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली घेतली. या बैठकीला उपायुक्त संतोष कंदेवाड आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी मिर्झा बेग, संजय जाधव, गिरीष कदम, यांत्रिकी व अन्य विभागाचे अधिकारी याचबरोबर सर्व विभाग प्रमुख व कर्मचारी या बैठकीला उपस्थित होेते. शहरातील 30 मे पर्यंत सर्व नाले सफाई करण्यात यावे. याचबरोबर शहरात एकूण अकरा ठिकाणी सखोल भाग असून या ठिकाणी पावसाळ्यात मोठ्या ठिकाणी पाणी साचले जाते. यासाठी वेगळी यंत्रणा तयार करण्यासाठी महापालिकेने आता पुढाकार घेतला आहे. याचबरोबर शहराच्या चारही झोनमध्ये 24 तास आपत्ती व्यवस्थापनाचे केंद्र उघडून यातून नागरिकांना सुविधा पुरविल्या जाणार आहेत. नालीसफाईच्या कामाबाबत महापालिका कर्मचाऱ्याने कोणताही निष्काळजीपणा करु नये युध्द पातळीवर कामे हाती घेऊन शहरातील सर्वनावे 1 जूनच्या अगोदर साफ करण्यात यावे. जणे करून पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचा निचरा नाल्याच्या मार्फत विना अडथळा होण्यासाठी मदत होणार तसेच शहरातील विविध भागाच्या रस्त्यावर सध्यास्थितीत बांधकामाचे साहित्य पडले आहेत. हे साहित्य देखील 1 जूनच्या अगोदर उचलण्याच्या सुचना बांधकाम विभागाला देण्यात आल्या आहेत. बांधकाम विभागानी शहरातील संपूर्ण रस्त्याचे सर्वे पाहून ज्या ठिकाणी साहित्य पडले आहे. ते साहित्य उचलण्यासाठी संबंधीत मालमत्ता धारक सुचना देऊन साहित्य काढण्यासाठी सांगावे. जर मालमत्ता धारकांकडून साहित्य उचलण्यात आले नाहीत. तर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करुन महापालिकेने हे साहित्य 1 जूनच्या आत उचलावे याचबरोबर पावसाळ्याच्या कालावधीत आरोग्य विभागाला आणि पाणी पुरवठा विभागाने अधिक दक्ष राहून नागरिकांना कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. याची काळजी घ्यावी. विशेषता: पावसाळ्यात उदभवणाऱ्या आजाराच्या संदर्भात जनजागृती करुन योग्यते खबरदारीचे उपाय आरोग्य विभागाने करावेत. तसेच पाणी पुरवठा विभागानेही पावसाळ्याच्या कालावधीत नळांना दुषीत पाणी पुरवठा होणारनाही. याची खबरदारी घ्यावी अशा सुचना या बैठकीत देण्यात आल्या असल्याची माहिती सांगण्यात आली.

    Tags