logo

BREAKING NEWS

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीला आता राज्य कर्मचाऱ्यांना मिळणार 10 हजार अग्रीम

नांदेड, सन 2018 पासूनच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती सणापासून राज्यातील सर्व अराजपत्रीत राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 10 हजार रुपये अग्रीम मिळणार आहेत असा शासन निर्णय आज दि.18 मे 2017 रोजी जारी झाला असून त्यावर महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव अ.श्री.दिघे यांची स्वाक्षरी आहे.

सन 1962 च्या परिपत्रकान्वये महाराष्ट्राच्या सामान्य प्रशासन विभागाने राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना 9 महत्त्वांच्या सणांसाठी अग्रीम रक्कम देण्याची मंजूरी दिली आहे. दि.19 जानेवारी 2002च्या शासन परिपत्रकान्वये या यादीमध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा समावेश करण्यात आला आहे. मुंबई वित्तीअधिनियम 1969 मधील नियम क्रमांक 142 (जे)अनुसार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांना दहा हजार रुपये अग्रीम रक्कम मिळणार आहे. 

मिळालेले  दहा हजार अग्रीम रुपये परत करण्यासाठी या अगोदरच्या प्रमाणेच त्याचे नियम असतील.  पाचशे रुपये महिला प्रमाणे अग्रीम दिलेलेली रक्कम कर्मचाऱ्यांच्या पगारीतून कापली जात असते असे एका शासकीय कर्मचाऱ्याने सांगितले. हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर सर्वांसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. त्याचा सांकेताक क्रमांक 201705181503506305 असा आहे.  डॉ. बाबासाहेब आंबबेडकर जयंतीदिनी राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रीम रक्कम देण्याची मंजूरी 2002 मध्ये झाली असतांना प्रत्येक्षात ती रक्कम सन 2018 पासूनच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आगोदरपासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना प्राप्त होणार आहे. याबद्दल अनेक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.  

    Tags