logo

नांदेड, स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत राज्यातील संपूर्ण जिल्हे हागणदारीमुक्त करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्यातही राबविला जात आहे. अर्धापूर तालुका हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला आहे. ज्या कुटूंबाकडून शौचालय बांधले जात नाही त्या कुटूंबातील व्यक्तीला ग्राम पंचायतीकडून देण्यात येणारे वैयक्तीक कोणतेही प्रमाणपत्र यापुढे दिले जाणार नाही. तर ग्रामपंचायत कायद्यानुसार 200 ते 1200 रूपये दंड लावण्याचा अधिकार ग्राम पंचायतला आहे. यामुळे सार्वजनिक ठिकाणी शौचालयास बसणे कायदेशीर गुन्हा ठरतो असे मत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शुक्रवार दि. 19 मे रोजी जिल्हा परिषदेच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये जिल्हाधिकारी अरुण डोंगरे व मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी ग्राम पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी व्ही.आर. कोंडेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रभारी उप मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.प्रविणकुमार घुले,  स्थागुशा पोलिस निरिक्षक संदीप गुरमे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक मिलिंद व्यवहारे, संनियंत्रण मुल्याकंन सल्लागार प्रविण पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. जिल्ह्यामध्ये एकूण 1304 ग्राम पंचायती असून यापैंकी 177  ग्राम पंचायती हागणदारीमुक्त झाल्या आहेत तर 1337 हाणगदारीमुक्त करायचे आहेत. याचबरोबर 4 लाख 36 हजार 513 जिल्ह्यात कुटूंब असून यापैंकी 2 लाख 11 हजार 439 कुटूंबाकडे शौचालय आहेत तर 2 लाख 25 हजार 74 जणांकडे अद्यापही शौचालय नाहीत. एकंदरीत 48.44 टक्के जिल्हा शौचालयमुक्त झाला आहे. उर्वरीत जिल्हा शौचालयमुक्त करण्यासाठी जिल्हा प्रशासन जिल्हा परिषदेसोबत असल्याचे मत जिल्हाधिकारी डोंगरे यांनी यावेळी व्यक्त केले. भंडारा जिल्हा हा शंभर टक्के हागणदारीमुक्त झाला आहे. याठिकाणची असणारी 13 ते 14 व्यक्तींची टीम नांदेड जिल्ह्यात दाखल होणार आहे. या टीमच्या माध्यमातून हदगाव तालुक्यात काम केले जाणार असून तब्बल ही टीम एक महिना हदगाव तालुक्यात तळ ठोकणार आहे. शौचालय बांधण्याच्याबाबत जिल्हा परिषदेने जो काही पुढाकार घेतला आहे तो पुढाकार अभिमानास्पद आहे. मी सोलापूर येथे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी असताना शौचालय बांधण्यासाठी अनेक गावात जाऊन पुढाकार घेतला आज नांदेड जिल्ह्याचा जिल्हाधिकारी असून मला याचा अभियान आहे व जिल्हा परिषद राबवित असलेल्या या अभियानाला पुर्ण सहकार्य करण्याचे वचन दिले.

शौचालय बांधकाम करत असतानाही लोकचळवळ झाली पाहिजे तरच हे पूर्ण होऊ शकेल विशेषत: करून प्रत्येक ग्रामपंचायतीला उद्दिष्ट दिले जाऊन काम पूर्ण करून घेतले जाणार आहे. ज्या कुटूंबाकडून शौचालय बांधण्यासाठी टाळाटाळ होत आहे, अशा कुटूंबांना ग्रामपंचायत कोणतेही प्रमाणपत्र देणार नाही ऐवढेच नसून येणाऱ्या काळात रेशनकार्ड मधूनही व वैयक्तीक लाभाच्या यादीतूनही नाव त्या कुटूंबाचे वगळले जाणार आहे. सध्या शासनाकडून 12 हजार रूपये अनुदान असून हे अनुदानही येणाऱ्या काळात बंद होणार यामुळे नागरिकांनी या अनुदानाचा सध्या लाभ घ्यावे, कारण अनुदान बंद झाल्यानंतरही शौचालय मात्र बांधावेच लागेल, विशेषत: ज्याचे नाव बेसलाईनमध्ये नाही अशा कुटूंबाना नरेगाच्या माध्यमातून शौचालय बांधून दिले जाणार आहे, यामुळे प्रत्येकांनी यात सहभाग घेऊन जिल्हा हागणदारीमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे ऐवढेच नसून ग्रामपंचायत अधिनियमन कायद्याअंतर्गत सार्वजनिक ठिकाणी शौचालयास बसणाऱ्या व्यक्तीला 200 रूपयांपासून 1200 रूपयांपर्यंत दंड लावण्याचा अधिकार आहे, अशी माहिती संयुक्त पत्रकार परिषदेत जिल्हाधिकारी अरूण डोंगरे आणि जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिनगारे यांनी दिली.

    Tags