BREAKING NEWS

logo

भोकर, शहरातील आंबेडकर चौकात इंजि. विश्वंभर पवार मित्रमंडळाच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. जम्मु काश्मीर नवसेरा सेक्टर येथे कोल्हापूरचे सावन माने, औरंगाबादचे संदिप जाधव हे शहिद झाले त्यांना भोकर येथे २४जून रोजी दोन मिनिटे श्रध्दांजली अर्पण करून पाकिस्तान विरोधी घोषणाबाजी करत नारे देण्यात आले. यावेळी इंजि. विश्वंभर पवार, प्रा. व्यंकट माने, राजु कदम, राजु कोरटे, गोविंद मेटकर, भरत वानखेडे, शेख अर्शद, शंकर बोरगावकर, शिवराज स्वामी अहमद करखेलरीकर, राजेश चंद्रे, उत्तम बाबळे, रमेश  गंगासागरे, भारत वानखडे, अरुण डोईफोडे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती . 

भोकरला राष्ट्रवादी युवती काँग्रेसची बैठक संपन्न 
तालुक्यातील राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कामकाजाची आढावा बैठक २५जुन रोजी भोकर येथे घेण्यात आली. या बैठकीस राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष सोनाली आंचेगावकर, यशस्विनी सामाजिक अभियानच्या निर्मला कांबळे, हिमायतनगर येथील अध्यक्षा प्रतिक्षा येरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शहर आणि तालुका महिला पदाधिकाऱ्यांची नविन निवड करण्यासाठी, संघटनात्मक बांधणी करण्यासाठी आणि युवतीना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी काय नियोजन करता येईल याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या बैठकीस शेख सलिम सर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेश्वर कदम यांच्यासह युवती, युवक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

    Tags