BREAKING NEWS

logo

भोकर, येथील विद्युत वितरण कंपनी कार्यालयात प्रभारी काम पाहणारे सहाय्यक अभियंता महेश भांगे यांची हदगाव तालुक्यातील तळणी येथे बदली झाली आहे. मात्र भांगे यांना पुन्हा भोकर येथील कार्यालयातच नियुक्ती द्यावी अशी मागणी ग्राहक आणि भाजपा कार्यकर्त्यांकडुन होत आहे. 

भोकर येथील विद्युत वितरण कंपनीच्या शहर कार्यालयात मागील दोन वर्षापुर्वी वरीष्ठांच्या आदेशानुसार सहाय्यक अभियंता भांगे यांनी प्रभारी पदभार स्विकारला होता. त्यांनी आपल्या कार्यकाळात विद्युत ग्राहकांच्या समस्यांची तात्काळ दखल घेत त्या सोडविण्यासाठी तत्परता दाखविली. तसेच त्यांनी महावितरणच्या वसुलीसाठी, वीजचोरीवर आळा घालण्यासाठी मोठे प्रयत्न केले. त्यासाठी कर्तव्यदक्ष अभियंता भांगे यांना इतरत्र दिलेले नियुक्तीचे आदेश रद्द करून येथेच पुन्हा नियुक्ती द्यावी अशी मागणी होत आहे. भांगे यांची नियुक्ती पुन्हा भोकर येथे करण्यासाठी भाजपाचे जिल्हाउपाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, बाजार समितीचे संचालक गणेश कापसे पाटील,राजु अंगरवार, माधव शिंदे बटाळकर,प्रशांत कानडे, शिवा जाधव, माऊली पाटील यांच्यासह इतर कार्यकर्ते शुक्रवारी नांदेड येथे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन निवेदन देणार आहेत.

    Tags