BREAKING NEWS

logo

भोकर, महाराष्ट्र राज्य परिक्षा मंडळ पुणे कडून घेण्यात आलेल्या पुर्व ऊच्च प्राथमिक परिक्षा  चा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परिक्षेत ऋुतिका शिवाजीराव हाके या ग्रामिण भागातील विद्यार्थिनीने 92 % गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 7 वा रॅंक तर लातुर विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळवीला आहे. 

येथील गटशिक्षणाधिकारी कार्यालयात सर्व शिक्षा अभियानांतर्गत वरिष्ठ लेखापाल म्हणून कार्यरत आसलेले शिवाजी हाके यांची ती कन्या असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निमटोक ता. कळमनुरी. जि. हिंगोली येथे शिक्षण घेत होती. ग्रामिण भागात शैक्षणिक वातावरण नसताना तिने जेमतेम पारिस्थितीत यश मिळवीले आहे विशेष म्हणजे नवोदय चाचणी परिक्षेतही तिने यश संपादन केले असून वसमत येथील नवोदय विद्यालयासाठी पात्र ठरली आहे.ती यशाचे श्रेय आई -वडील ,मंजुळाबाई किन्हाळकर व जि प प्रा.शा निमटोक येथील शाळेचे शिक्षक,यांना देते . तीचे भविष्यात डॉक्टर होण्याचे माणस आहे. या यशाबद्दल गट शिक्षणाधिकारी डी.जी. पोहणे, शिविअ राजु मुधोळकर, एम . जी. वाघमारे, डी.डी. सुपे, नरसिंग जिड्डेवार, लक्ष्मण सुरकार, सुधांशु कांबळे, डेवीड ग्रॅहम्बल , सुरेश सोळंके, महम्मद फाजल, ओंकार पांचाळ, गजानन खुपसे अदी आधिकारी कर्मचाऱ्यांनी  अभिनंदन केले आहे.

    Tags