BREAKING NEWS

logo

भोकर, एका सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तीन आरोपींना २० वर्षाची सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार रुपये दंडाची शिक्षा भोकर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम. एस. शेख यांनी १ जुलै २०१७रोजी सुनावली आहे. 

भोकर येथील रेल्वेस्थानकाजवळ १८सप्टेबर २०१५ रोजी एक सोळा वर्षीय अल्पवयीन मुलगी उभी असल्याचे पाहुन आरोपी अॅटोचालक शेख अखलाख शेख लतीफ (वय २०) याने पिडीत मुलीसोबत ओळख करून जवळीकता साधली. तिच्या गावातील लोकांची ओळख सांगुन तिस अॅटोत बसविले. आणि सोबत आसलेले पांडुरंग पंजाबराव पिल्लेवाड (वय १९),परमेश्वर माधव सुर्यवंशी (वय२२) यांनी त्या मुलीस भोकर येथे चहा बिस्कीट देवुन तु बहिणीसारखी आहेस. म्हणत तालुक्यातील पाळज येथील शिवारात नेवुन रात्री ९ ते११ वाजताच्या दरम्यान आळीपाळीने जबरीने बलात्कार केला व जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर पाळज येथील गणपती मंदिराच्या परीसरात पिडीत मुलीस पैसे देऊन सोडुन पळुन गेले. या प्रकरणी भोकर पोलिसांत १९ सप्टेबर २०१५ रोजी पिडीत मुलीच्या फिर्यादीवरून गु. र.नं१३९/१५कलम ३७६(२), (आय), ३७६ (ड) ५०६भादवि व कलम ५(ग),६ बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस अधिक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी करुन, १४ डिसेंबर २०१५ रोजी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले या प्रकरणात ९साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पिडीत मुलीची साक्ष आणि ईतर साक्षीदारांची साक्ष गृहय धरून न्यायाधीश एम. एस. शेख यांनी आरोपी शेख अखलाख, पांडुरंग पिल्लेवार, परमेश्वर सुर्यवंशी या तिघांना सामुहिक बलात्कार करणे आणि अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी २० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दोन हजार दंड, दंड न भरल्यास दोन महिण्याची शिक्षा असा निर्णय दिला. सरकारी पक्षाची बाजु अॅड. एस. आर. कस्तुरे यांनी मांडली तर या प्रकरणात न्यायालयाचे पैरावी शेषराव चव्हाण यांनी सहकार्य केले.

    Tags