logo

भोकर, एका आदिवासी युवतीस मजुरीचे आमिष देवून तीची मध्यप्रदेशात विक्री करुन जबरीने लग्न लावून दिले व जिवे मारण्याची धमकी देत वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी भोकर पोलीसात चार जणांविरुद्ध दाखल करण्यात आला.

भोकर तालुक्यातील आमदरवाडी येथील १९ वर्षीय युवती ५ मे रोजी गावातीलच महिला शोभाबाई शंकुराव मेंडके यांच्याकडे कामाची मागणी केली. या महिलेने तुला नांदेडला काम लावून देतो म्हणून दुसरा आरोपी विठ्ठल दत्तराम सखोंडे रा.शेंबोली ता.मुदखेड यांच्या मदतीने नांदेड येथील दत्त नगर मध्ये यातील आरोपी सिताराम एकनाथ सुर्यवंशी यांचे घरी ठेवले.  त्यानंतर देवदर्शनासाठी म्हणून शिर्डी येथे नेवून युवतीचे एका मुलासोबत लग्न लावून देण्याचा प्रयत्न केला.परंतु त्या मुलाने मुलीचे आई - वडील सोबत नाहित म्हणत लग्नास नकार दिला.  यानंतर परत नांदेड येथे आणून घरात डांबुन ठेवले व एका ट्रव्हल्सने मध्यप्रदेशातील शेंगवा येथे नेले. याठिकाणी पीडीत युवतीची विक्री करून  पवन मोहणाजी मोड रा.शेंगवा (मध्यप्रदेश) याचेशी एक हार टाकुन लग्न लावून दिले. नंतर पवन व त्याचा वडील मोहणाजी छगन मोड यांनी तीस एका घरात डांबुन ठेवून पवन याने जिवेमारण्याची धमकी देत  वारंवार बलात्कार केला. पिडीत युवतीने घरी कुणीही नसताना गावाकडील नातेवाईकास फोन करुन माहिती दिल्याने यातील आरोपी विठ्ठल सखोंडे व सिताराम सुर्यवंशी  दोघे शेंगवा येथे आल्यावर मध्यप्रदेशातील पवन मोड व मोहणाजी मोड यांच्याशी  वादविवाद झाला म्हणून त्यांनी पीडीत युवतीस परत नांदेडला दि.२ जुलै रोजी आणले. परिस्थितीतून सावरल्यावर गुरुवारी पिडीत मुलीने भोकर पोलीसात फिर्याद दिल्या वरुन आरोपी शोभाबाई शंकुराव मेंडके, विठ्ठल दत्तराम सखोंडे, सिताराम एकनाथ सुर्यवंशी, पवन मोहणाजी मोड, मोहणाजी छगन मोड यांचे विरुध्द युवतीस पळवून नेवून जबरी बलात्कार व अनुसुचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्या नुसार गुन्हा नोंद करण्यात येवून पुढील तपास पोलीस उप अधिक्षक अर्चना पाटील करीत आहेत.

    Tags