logo

नांदेड, सार्वजनिक बांधकाम विभाग नेहमीच चर्चेत राहण्याचा प्रयत्न जाणिवपूर्वक करत असते, कारण याठिकाणचे अधिकारी हे चर्चेविना राहूच शकत नाहीत अशीच परंपरा गेल्या काही वर्षांपासून सुरू झाली आहे. जिल्ह्यातील अनेक कामांच्या चौकशा लागल्या असताना अधिकारी मात्र आपला हेकीखोरपणा सोडण्यास तयार नाहीत. तोटावाड यांच्या नांदेड पदभाराहून हा वरिष्ठ अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र राजपूत यांची बदली होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटत असला तरी त्यांचे पद अद्यापही रिक्तच असून या पदावर भोकर येथील कार्यकारी अभियंता तोटावाड यांच्याकडे हे पद देण्यात आले. तोटावाड हे पदोन्नतीने भोकर येथे कार्यकारी अभियंता या पदापर्यंत मजल मारली, पण नांदेड जिल्हा बांधकाम विभागात यांच्यापेक्षाही वरिष्ठ अधिकारी असून व या पदाच्या समकक्ष अधिकारी असून त्यांना या पदाचा लाभ देण्यात आला नाही. तोटावाड यांना नांदेडचा अतिरिक्त कारभार का देण्यात आला असा प्रश्न बांधकाम विभागात निर्माण झाला आहे. कार्यकारी अभियंता म्हणून माधव शंकपाळे आणि मिठ्ठेवाड हे या पदासाठी पात्र असतानाही नांदेड कार्यकारी अभियंत्यांचे पदभार अशा अनुभवी व वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्याची गरज असतानाही पदोन्नतीने मिळविलेल्या तोटावाड यांना नांदेडचा पदभार का सोपविण्यात आला. विशेषत: तोटावाड हे नांदेड बांधकाम विभागात उपअभियंता कार्यरत असताना त्यांच्या काळात झालेल्या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी आता समोर येत आहे. तोटावाड यांच्याकडे उपअभियंता हे पद असताना त्यांनी केलेला डिझेल घोटाळा हा मोठ्या प्रमाणात गाजला होता, त्याची चौकशी शेवटच्या टप्प्याला येऊन ठेपली असून लवकरच राज्य शासन यात दोषी असलेल्या सर्व अधिकाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया राबविणार आहे, असे असताना तोटावाड यांना पुन्हा याच विभागाचे कार्यकारी अभियंता म्हणून पदभार देण्यात आला आहे. पदभार दिल्यानंतर त्यांच्या कार्यकाळात त्यांनी घेतलेले निर्णय तसेच कामाचे आदेशाचे प्रत, अंदाजपत्रक किती बनविले याची सखोल चौकशी करण्याची मागणी समोर येत आहे.

    Tags