logo

नांदेड, नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता पदाचा पदभार घेतलेल्या तोटावाडकडून सध्या मनमानी कारभार चालविला जात आहे. शासनाच्या नियमावलीला धाब्यावर बसवून मनमानी कारभार सध्या सार्वजनिक बांधकाम विभागात चालविला जात आहे. शासनाकडून थकीत कामाच्या बिलापोटी दोन हेड अंतर्गत 14 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता. हा निधी वाटप करण्याचे काम प्रभारी कार्यकारी अभियंता तोटावाड यांनी एका रात्रीमध्ये मर्जीतील गुत्तेदारांना वाटप करुन मोकळे झाले. या निधीची चौकशी करण्याची मागणी गुत्तेदारतुन आता समोर येत आहे. 

नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाचा पदभार घेताच प्रभारी तोटावाड यांनी 25 जून रोजी प्राप्त झालेला निधी विशेषता: रविवार सुट्टी होती. तर दुसऱ्या दिवशी सोमवार असूनही ईदची सुट्टी होती. दोन दिवसाच्या सलग सुट्टीचा फायदा उचलत प्रभारी अभियंता तोटावाड यांनी आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना शासकीय विश्रामगृहावर रात्री बोलावून हेड क्रमांक 3 आणि 4 यातील 14 कोटीचा निधीचे वाटप अवघ्या काही मिनिटात वाटप करुन टाकले. विशेषता: काम झालेल्या बिलांसाठी शासनाने नांदेड सार्वजनिक बांधकाम विभागाकडे दिला होता. हा निधी शासनाच्या नवीन परिपत्रका- नुसार निधी वाटप करतांना श्रेष्ठतेनुसार निधी वाटप करण्याचा नियम असतांनाही तोटावाड यांनी मात्र या शासनाच्या नियमाला धाब्यावर बसवित आपल्या मर्जीतील गुत्तेदारांना हा निधी वाटप करुन आपली टक्केवारी त्यांनी मजबुत करुन घेतली. यामुळे नांदेड विभागाचे अधिक्षक अभियंता शेलार यांनी तोटावाड यांना नांदेडचा प्रभारी पदभार हा कामामध्ये अनियमितता असणाऱ्या कामाला परवानगी देण्यासाठी यांच्याकडे हा पदभार दिला का? अशी चर्चा होत असली तरी तोटावाड यांनी एकाच रात्रीत 14 कोटीचा निधी वाटप केलेल्या गुत्तेदारांची व कामांची यादी प्रसिध्द करावी अशी मागणी गुत्तेदारांतून आता समोर येत आहे.

केंद्र आणि राज्य शासन विशेषता:सार्वजनिक बांधकावर विशेष लक्ष देवून आहे. कारण या विभागाकडून होणारी प्रत्येक कामेही पारदर्शक व दर्जेदार स्वरुपाची झाली पाहिजेत यासाठी शासन अग्रही भूमिका घेत आहे. पण नांदेड जिल्हा हा शासनाच्या या पारदर्शकतेला बाजूला ठेवून गेल्या 60 वर्षापासूनची परंपरा नांदेड सार्वजनिक बांधकाम विभाग पुढे नेण्याचे काम अजूनतरी करीत आहे. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाला चपराक बसण्यासाठी या विभागाची सखोल चौकशी होणे गरजेचे असून प्रभारी कार्यकारी अभियंता तोटावाड यांच्यावर अगोदरच चौकशीच्या ससमिरा असतांनाही तोटावाड यांनी पुन्हा नियमाला बाजूला ठेवून कामे सुरुच ठेवली आहेत. यामुळे यांची सखोल चौकशी वरीष्ठ पातळीवरुन होणे गरजेचे असल्याचे बोलल्या जात आहे.                                                                                                                                   

    Tags