logo

भोकर, कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादी सूचना फलकावर लावावी, नवीन कर्जाचे वाटप तात्काळ सुरू करावे या मागणीसाठी १० जुलै रोजी भोकर शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या दोन्ही शाखेसमोर शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख व शहर प्रमुख माधव जाधव यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी ढोल बजाओ आंदोलन केले.

भोकर येथील शिवसैनिकांनी ढोल बजाओ आंदोलन करून बँकेच्या शाखा व्यवस्थापकांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील महिण्यात राज्य शासनाने कर्जमाफीची घोषणा केली. निकषासह जीआर आपणाकडे येवूनही अद्यापही पात्र शेतकऱ्यांची यादी जाहीर केलेली नाही. यादी जाहीर केल्यास नवीन कर्ज द्यावे लागेल, यासाठी बँकेकडून यादी लावण्यात आलेली नाही. तरी कर्जमाफीतील पात्र असलेल्या शेतकऱ्यांची  यादी तात्काळ सूचना फलकावर लावावी आणि पात्र शेेतकऱ्यांना नवीन कर्जाचे वाटप करावे अन्यथा बँकेला कुलूप ठोकण्याचा इशारा दिलेल्या निवेदनात दिला आहे. भारतीय स्टेट बँकेच्या बसस्थानक रोडवरील शाखेसमोर ढोल बजाओ आंदोलनात शिवसेना तालुकाप्रमुख सतिश देशमुख, युवा सेनेचे अमोल पवार, सुनिल चव्हाण, उषाताई नर्तावार, सुभाष नाईक, पांडुरंग वर्षेवार, हणमंत  कदम यांनी तर किनवट रोडवरील एसबीआय शाखेसमोर करण्यात आलेल्या आंदोलनात शहर प्रमुख माधव जाधव, परमेश्वर राव, सोहम शेट्टे, वैभव धोंडगे, प्रकाश डोईफोडे, सजन जाधव, आकाश दुधारे, शंकरराव इंगोले, विठ्ठल धोंडगे यांच्यासह अनेकांनी सहभाग घेतला होता.

    Tags