logo

BREAKING NEWS

भोकर तालुक्यातील १६ सोसायटीवर प्रशासकिय चेअरमन, संचालक

भोकर, तालुक्यातील १६सेवा सहकारी सोसायटीवर प्रशासकिय चेअरमन आणि संचालकांची निवड करण्यात आली निवड झालेल्या नवनिर्वाचित चेअरमन, संचालकांचा भाजपाच्या वतीने सत्कार करण्यात आला. 

भोकर तालुक्यातील मुदत संपलेल्या १६ सेवा सहकारी सोसायटीवर निवड झालेल्या चेअरमन आणि संचालकांचा भाजपाच्या वतीने सत्कार करून निवडीचे प्रमाणपत्र देण्यात आले यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर पाटील लगळुदकर, ओबीसी जिल्हाध्यक्ष राजेश करपे, प्रकाशमामा कोंडलवार, हरिभाऊ चटलावार, प्रशांत पोलशेटवार, शिवसेना तालुकाप्रमुख सतीश देशमुख, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सुनिल चव्हाण यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती या निवडीत गणेशराव कापसे (बटाळा), दत्ता अक्लवाड (हळदा), पुंडलिक जाधव (बेंद्री), भर्डेवाड (दिवशी खु.),विठ्ठल जाधव (दिवशी बु.),भगवान दांडेकर (नांदा), विलास शिंदे (भोसी) यांचा समावेश आहे तर पांडुरणा, चितगिरी, बेंबर, इळेगाव, कोळगाव, जांभळी, भुरभुशी गावातीलही चेअरमन, संचालकांच्या निवडी झाल्याची माहिती किशोर पाटील लगळुदकर यांनी दिली.

    Tags