logo

भोकर, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी शेतकऱ्यांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे भोकर येेेेथील शिवसैनिकांनी तीव्र निषेध व्यक्त करत दानवे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारुन आंदोलन केले आहे. 

भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी  जालना येथे शेतक-यांविषयी वादग्रस्त वक्तव्य  केल्याचा जाहीर निषेध व्यक्त करीत भोकर येथील आंबेडकर चौकात शिवसेनेच्या वतीने ११ मे २०१७ रोजी सकाळी ११:३० वाजता जोडे मारो आंदोलन केले.यावेळी झालेल्या आंदोलनात तालुकाप्रमुख सतिश देशमुख, सरपंच संघटनेचे तालुकाध्यक्ष अध्यक्ष सुनिल चव्हाण, माजी तालुकाप्रमुख प्रदिप दाैलतदार, नारायण पाटील, शहर प्रमुख माधव जाधव, सुनिल जाधव, श्याम वाघमारे, जुगनू आलेवाड, वामन पर्वत, हनमंत कदम, संभाजी देशमुख,मारोती पवार, पांडूरंग वर्षेवार, बाळू चिंताकुटे, दासा चितोळे,राजू पोगरे, राजू मोरे, परमेश्वर राव यांच्यासह अनेक शिवसैनिकांनी सहभाग घेतला होता.

    Tags