LOGO

वाहन न थांबविल्याच्या कारणावरून अज्ञात ईसमाने केला खंजीरने वार

मनोजसिंह चौव्हाण - 2017-05-15 22:17:44 - 1330

चालक गंभीर जखमी... तीन वाहनांचे नुकसान... भोकर - नांदेड रस्त्यावरील घटना

भोकर, खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या टाटा मॅजिक वाहनातून प्रवास करणाऱ्या एका अज्ञात इसमाने वाहन का थांबविले नाही म्हणून चालकास खंजीरने मारुन तीन वाहनांचे नुकसान केल्याची घटना १४मे २०१७रोजी भोकर - नांदेड मार्गावरील खरबी गावाजवळ घडली या प्रकरणी पोलीसात अज्ञात व्यक्ती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नांदेडहून भोकरकडे प्रवासी घेऊन येणारे टाटा मॅक्झीमो क्र. एम एच २६ ए एफ २७८८ हे वाहन रविवारी रात्रीला पांढरवाडी येथील बसस्थानकवर येताच या  वाहनात एक अज्ञात प्रवाशी बसला सदरील वाहन पुढील मार्गावर निघून खरबी जवळ येताच तो अज्ञात इसम 'तु गाडी का थांबवली नाहिस 'म्हणत चालक बालाजी विठ्ठल करंदिकर रा.रिठ्ठा याच्यासोबत वाद घालून आपले जवळील खंजरने हातावर आणि पायावर वार करून जखमी केले यावेळी या रस्त्यावरुन जाणारी राज्य परिवहन महामंडळाची बस क्रमांक एम. एच २०बी.ई.३५४६आणि स्कॉर्पिओ क्रमांक एम. एच. ०६ बीबी. एम. ४७९१या चारचाकी वाहनाचे समोरील  काचा फोडले तर ज्या वाहनातुन प्रवास केला त्या टाटा मॅक्सिमो वाहनाचे असे अंदाजित ३३ हजाराचे नुकसान केले सदरील घटनेची माहिती मिळताच भोकर पोलिस स्थानकाचे पोलीस उपनिरीक्षक सुनिल चव्हाण आणि बारडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रेवनाथ डमाळे यांच्यासह सहकारी घटनास्थळी भेट दिली याबाबत  चालक बालाजी विठ्ठल करंदिकर यांच्या फिर्यादिवरुन भोकर पोलीसात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्ती विरुद्ध कलम ३२३, ३३६, ३४१ भादवी ४/५ आर्म अँक्ट व सार्वजनीक संपत्ती हानी प्रतीबंधात्मक कायद्या प्रमाणे गुन्हा नोंदवीन्यात आला आहे. पुढील तपास स.पो.नि. सुरेश भाले करीत आहेत.

Tag:
Download our mobile app here :

Contact us

C/O Utkarsh PhotoGallary,
Narsinha Digital photo,
Rukhmini Nagar, At.Post.& Tq.Himayatnagar
Dist. Nanded. Pin - 431802.

+91 9764010107, +919767121217, +919420538747.

02468-244739

anilmadaswar@gmail.com,
nandednewslive@gmail.com,

Back to Top