logo

BREAKING NEWS

अनुष्का ठाकुर श्रेया परीक्षेत राज्यात दुसरी

नांदेड, श्रेया इंटिलिजंट अँकँडमीच्या परीक्षेत अनुष्का गोकुलसिंह ठाकुर (सोनखेडकर) हिने घवघवीत यश संपादन केले असुन या परीक्षेत राज्यातुन दुसरी येण्याचा मान मिळविला आहे. 

नांदेड शहरातील हडको येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यालयात इयत्ता दुसऱ्या वर्गात शिकणारी अनुष्का ठाकुर हिने मागील फेब्रुवारी महिन्यात घेण्यात आलेल्या श्रेया अँकँडमीची परीक्षा दिली होती या परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर करण्यात आला यात तिने१००पैकी ९८गुण घेऊन राज्यात दुसरी येऊन यश संपादन केले तिला या परीक्षेसाठी मुख्याध्यापक पदमाकर राजुरकर वर्गशिक्षक मोरे सर, मस्के सर, वडील गोकुलसिंह ठाकुर, आई सरीता ठाकुर यांचे मार्गदर्शन लाभले या यशाबद्दल अनुष्काचे किशनसिंह चौव्हाण, संजयसिंह ठाकुर, विजयेंद्रसिंह ठाकुर, डाॅ. राम नाईक, विठ्ठल फुलारी, बाबुराव पाटील, बालाजी शेवाळे यांच्यासह अनेकांनी कौतुक केले आहे.

    Tags