logo

BREAKING NEWS

भोकर जवळ ट्रकखाली सापडुन चालकाचा मृत्यु

भोकर, गाडीच्या ब्रेक कँपची हवा काढत आसताना ट्रकखाली आल्याने एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि.१७ रोजी सायंकाळी ४ वाजता सीताखंडीजवळ घडली आहे.
 
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, मयत चालक ब्रमेश्वर व्यंकटेश राव वय ३५ वर्ष रा. कंचिंन चेलरा तालुक्यातील नंदीग्राम जि. कृष्णा येथील राहीवाशी आहे. सादर चालक राजस्थान येथुन लोडेड ट्रक क्रमांक एपी १६ टिई २२१६ घेऊन आंध्रात जात होता. दरम्यान भोकर तालुक्यातही नांदेड रस्त्यावरील सिताखांडी घाटात ट्रक बंद पडला. यासाठी साईडला ट्रक लावून खाली जैकद्वारे गाडीच्या ब्रेक कँपची हवा काढत होता. दरम्यान या ठिकाणी उत्तर असल्याने अचानक ट्रक खाली आला, आणि ट्रकखाली असलेल्या चालकाच्या अंगावरून ट्रक गेल्याने तयाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेत चालकाचा मृत्यू झाल्याने सर्व स्तरातून हालहाल व्यक्त होत आहे. 

    Tags