logo

BREAKING NEWS

देवदर्शन करण्यासाठी जाणाऱ्या मिनीबसला अपघात; तीन ठार चार जखमी

नरसी महामार्गावर कासराळी येथिल कमल  पेट्रोल पंपाजवळ पुणे जिल्ह्यातील भाविकांच्या मिनी बसला आज  सकाळी ६-०० वाजताच्या सुमारास भरधाव वेगात येणाऱ्या रेतीच्या टिप्परने समोरासमोर दिलेल्या जब्बर धडकेत तीन जण ठार तर चार भाविक गंभीर जखमी झाले असुन जखमीना बिलोली येथिल ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार  करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथें हलविण्यात आले.

पुणे जिल्ह्यातील जवळपास 15 ते 18 भाविक तेलंगना राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील खुदनापुर येथे देवदर्शनासाठी MH.12 HB -1957 या मिनी बसने प्रवास करीत आसताना नर्सि - बिलोली या महामार्गावर आज दि.30 रोजी सकाळी  6-00  वाजताच्या सुमारास काळाने झेप घेतल्याने बिलोली कडुन भरधाव वेगात येणारा रेतीचा टिप्पर क्र .MH04-F3  8576 या वाहान चालकाने निष्काळजीपणे वाहान चालवत समोरासमोर जब्बर धडक देउन भाविकांच्या वाहानाचा डाव्या बाजुचा अर्धा छताचा भाग कापत नेला .या दिशेने बसलेले भाविक  जयश्री गणपत कडतन 55 वर्षे रा.स्वारगेट पुणे, विजय माला   विजय कडतन 50 वर्षे रा.स्वारगेट पुणे व सार्थक राजेश या नावाचा 12 वर्षाचा मुलगा यात ठार झाले तर वरद संतोश चिञे वय 11वर्ष रा. धनकवाडी ता.काञज जि.पुणे , गंगाराम पंढरीनाथ कडतन वय 85 वर्षे , कस्तुरी गंगाराम  कडतन 30  वर्षे व मिनि बस  चालक हे यात गंभीर जखमी झाले आसुन जखमीना तात्काळ बिलोली येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय  अधिकारी डाँ.तानाजी लवटे यांनी प्राथमिक उपचार करुन पुढील उपचारासाठी नांदेड येथें  पाठविण्यात आले. यात अनेकांना किरकोळ दुःखापती झाल्याचे दिसुन आले. या घटनेची फिर्याद संतोश सुधाकर चिञे रा.धनकवाडी ता.काञज जि. पुणे यांच्या तक्रारी वरुन टिप्पर चालक यांच्या विरुध्द बिलोली पोलिस ठाण्यात भादवि 304 (A)279, 337 ,338 ,427 अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आसुन माञ टिप्पर चालक आरोपी फरार असुन सदरील घटनेचा तपास स. पो.नि.चव्हाण हे करित आहेत सदर दुर्दैवी घटने बद्दल तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे .

रेती वाहतुकीवर  नियंत्रणाची गरज 
------------------
हा अपघात सकाळी झाला आहे,तेव्हा सूर्योदय सुद्धा झाला नव्हता,मग महसूल कायद्यात तर रेतीची वाहतूक फक्त सूर्योदय ते सूर्यास्त अशीच करता येथे.मग हा टिप्पर चालक दिवस उजाडण्या अगोदर रेतीचा टिप्पर घेऊन कसा आला हे पाहणे अत्यंत गरजेचे आहे.सोबतच रात्रीच्या रेती वाहतुकीवर कोणाचे नियंत्रण आहे त्यांची काहीच जबाबदारी नाही काय ? हा प्रश्न समोर आला आहे. तसेच  रेती उपसा परवानाच्या नावाखाली तालुका महसुल, प्रशासनाच्या आशिर्वादाने दिवस-राञ अवैध रेती वाहातुकीच्या वर्दळीमुळे प्रवासी वाहानधारक माञ नाकी नउ येत आहेत .रेती घाट चालकाच्या मिलि- जुली भगत मुळेच की काय ? परीवहन अधिकारी यांचा लाल दिवा या भागात फडकतच नाहीत यामुळे अवैध रेती वाहानधारकाचे मनोबल दिवसेन दिवस  वाढत चाल्याने आशा अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहेत .

    Tags