logo

BREAKING NEWS

बिलोलीत बसव ब्रिगेड कडुन लक्ष्‍मण ठक्‍करवाड यांच्‍या पुतळयाचे दहन

बिलोली, लिंगायत समाज्‍याच्‍या प्रतीव्‍देष भावनेने राजकारण करणा-या जि.प.सदस्‍य लक्ष्‍मण ठक्‍करवाड यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळयाचे दहन बिलोली येथील एक बैठकीत बसव ब्रिगेड तर्फे करण्‍यात आले आहे. 

बिलोली तालुक्‍यातील कासराळी येथील ग्राम पंचायतीचे सरपंच सौ. ललीता संग्राम हायगले हे भाजपा पक्षाचे असताना सुध्‍दा भाजपाचेच जिल्‍हा परिषद सदस्‍य तथा पॅनल प्रमुख लक्ष्‍मण ठक्‍करवाड यांनी जातीय व्‍देष्‍यातुन आकस बुध्‍दीने अविश्‍वास ठराव दाखल केल्‍याच्‍या कारणावरुन बिलोली येथे बसव ब्रिगेडचे संस्‍थापक अध्‍यक्ष अॅड. अविनाश भोसिकर यांच्‍या अध्‍यक्षेतेखाली झालेल्‍या बैठकीत ठक्‍करवाड यांचा धिक्‍कार व निषेध करण्‍यांत आला आहे.  लिंगायत समाजाच्‍या मतावार सत्‍ता पदे उपभोगणा-या ठक्‍करवाड यांनी माजी जि.प. सदस्‍य संग्राम हायगले हया लिंगायत समाजाच्‍या नेतृत्‍वाचे सातत्‍याने राजकीय खच्‍चीकरण केले.

त्‍यात भर म्‍हणजे त्‍यांच्‍या सौभाग्‍यवती कासराळी ग्राम पंचायतीच्‍या सरपंच होत्‍या मात्र जाणिव पुर्वक अविश्‍वास ठराव दाखल करुन ठक्‍करवाड यांनी आपण लिंगायत विरोधी असल्‍याचे दाखवून दिल्‍याच्‍या  संतप्‍त प्रतिक्रीया बैठकीत देण्‍यांत आल्‍या तदनंतर ठक्‍करवाड यांच्‍या प्रतिकात्‍मक पुतळयाचे दहन करुन निषेध करण्‍यात आला आहे. यावेळी अॅड. अविनाश भोसिकर यांच्‍यासह, डॉ. रत्‍नाकर कु-हाडें , माजी प.स. उपसभापती उमाकांत गोपछडे, भाजपा तालुकाध्‍यक्ष  आनंदराव पाटील बिरादार, अशोक कदम,   मोहन जाधव, इरवंत सोमशेटवाड, विपुल पटने, माधवराव पा. मुंके, गणेश हांडे, शंकर महाजन,  कमलाकर पा. मोरडे, गिरीराज बाबणे, शिवकुमार कोदळे, मष्‍णा पा., बळवंत लुटे, बसवंत बिरकुरे, मनोहर महाजन, प्रकाश महांडे, दिगांबर मोघे, दगडे सर, ओमराज भालें, वसंतराव पाटील. शिवाजी पांडागळे, बाबुराव खेडे, शंकर स्‍वामी, त्र्यंबक पा सावळीकर, शालीग्राम भाटी, शिवा पाटील, राजेश्‍वर चिकनपुरे, सुभाष शिंदे माजीद शेख, दिपक संदलोड, शिवा जाकापुरे, महर्षि वाल्‍मीकी संघटनेचे जिल्‍हाध्‍यक्ष गजानन कोटपलवाड दत्‍तात्रय शिंदे, यांच्‍यासह तालुक्‍यातील लिंगायत, मराठा व बहुजन समाज बांधव मोठया संख्‍येने सहभागी होते.  

    Tags