logo

नांदेड, जिल्ह्यात मृगनक्षत्रानंतर शुक्रवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास वादळी वार्यासह  विजांचा कडकडात कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पावसाला सुरुवात झाली आहे. पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यावर्षी समाधानकारक पाउस झाल्यास चांगले उत्पादन मिळून डोक्यावरील कर्जमुक्ती होईल अशी अशा शेतकर्यांना वाटत आहे. 

यंदाच्या खरीप मोसमात समाधानकारक पाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाजाने  शेतकऱ्यांच्या अशा उंचावल्या आहेत. त्यामुळे तळपत्या उन्हाची तमा न बाळगता बळीराजाने पेरणीपूर्व मशागतीचे कामे आटोपून अगोदरच तयारी केली आहे. गेल्या दोन दिवसापासून आभाळात ढगांची दाटून गर्दी होत असली तरी समधानकारक पाउस काही पडत नाही. परंतु दि.०८ शक्रवारी अचानक वातावरणात बदल होऊन कुठे अर्धा तास तर कुठे काही वेळ पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे वातावरण थंड गार झाले होते. शुक्रवारी अक्षरश्या दिवसभर उकाड्याने सर्वाना हैराण केले असून, आग ओकणाऱ्या सूर्यामुळे अंगाची लाही लाही झाली. मृग नक्षत्राची सुरुवात झाल्यानंतर दुसर्या दिवशी सायंकाळी ६ वाजता वादळी वारे, विजांचा कडकडात, कुठे जोरदार तर कुठे रिमझिम पावस झाल्याने उकाड्यापासून दिलास मिळाला आहे. आता यापुढे जोरदार पाउस होईल अशी अशा सर्वाना लागली असून, जिल्ह्यातील शिवणी, किनवट, इस्लापूर, हिमायतनगर, देगलूर, भोकर, नांदेड, उमरी, परिसरात वादळी वार्यासह विजांच्या कडकडाट रिमझिम पावसाला सुरूवात झाली आहे. तसेच जिल्ह्यातील अनेक तालुका परिसरात वादळी वार्यासह रिमझिम पावसास सुरूवात झाली असल्याचे आमच्या ठीकठीकानच्या प्रतिनिधींनी सांगितले. शेतकऱ्यासह सर्वसामान्य नागरिक समाधानकारक पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. 

गतवर्षी नांदेड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात कापसाचा पेरा सर्वाधिक होता. परंतु अर्ध्याहून अधिक पिके दुष्काळामुळे गेली, तर उर्वरित कपाशीच्या पिकापासून मिळालेल्या उत्त्पन्नास कमी भाव आला. त्यामुळे यावर्षी जादातर शेतकरी सोयाबीन पेरणीवर भर देण्याच्या तयारीत आहेत. तर पाण्याचे स्त्रोत असलेले शेतकरी कपाशी लागवडीवर भर देणार आहेत. एकुनच कालपासून रिमझिम का होईना पावसाला सुरुवात होऊ लागल्याने शेतकरी बांधवात आनंदाचे वातावरण आहे. यंदा पाऊस पाणी चांगला झाल्यास सतत तीन वर्षापासून होत असलेल्या दुष्काळावर मात करता येईल. या आशेने बळीराजा पेरणीपूर्व मशागतीची कामे आटोपून बी - बियाणे खरेदीसाठी बाजारात दाखल झाला आहे. 

वैरण व इंधन जमा करण्याची चिंता  
गेल्या दोन दिवसापासून आभाळ दाटून येऊ लागल्याने वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे आता मान्सूनचे आगमन होईल आणि पेरणीला सुरुवात करता येईल याच्या प्रतीक्षेत शेतकरी आहे. तत्पूर्वी आठ महिने सर्जा - राज्यासह अन्य जनावरांचा लागणाऱ्या वैरण, घरातील इंधांसाठी लागणारे लाकडे, पऱ्हाट्याची जुळवा जुळवा करण्यात अक्खे कुटुंब मग्न झाले असल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. यंदा दुष्काळामुळे वैरनाचे भाव गगनाला भिडले असून, कडबा १५ ते २० रुपये पेंडी, गावात २० ते २५ रुपये पेंडी या दराने विक्री केली जात आहे. शेजारील तेलंगाना राज्यातील शेतकरी वैरण खरेदीसाठी मराठवाड्यात येत असल्याने वैरणाचा अभाव जाणवू लागला आहे. हि बाब लक्षात घेता शासनाने चारा डेपो सुरु करणे गरजेचे होते. परंतु अद्याप याची सुरुवात झाली नसल्याने शेतकर्यांना ऐन खरीप हंगामात वैरणासाठी भटकंती करावी लागत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी नांदेड न्यूज लाईव्हशी बोलून दाखवीले. 

    Tags