logo

नांदेड, देगलूर शहरात नाली साफसफाई करणाऱ्या एका कामगाराला दोन जणांनी मारहाण करुन शासकीय कामात अडथळा केल्याचा प्रकार दि.11मे रोजी घडली.

पंढरी सखाराम डोपेवाड हे नगरपालिका देगलूर येथे कामाठी या पदावर कार्यरत आहेत. दि.11 जून 2017 रोजी सायंाकाळी 5 वाजता देगलूर येथील भायेगाव रोडवरील एका नालीचा कचरा साफ करत असतांना तेथे दोन जणं आले आणि आमच्या घरासमोरील फरशी का काढली असे सांगून पंढरी डोपेवाडला शिवीगाळ केली. तेंव्हा पंढरी डोपेवाड यांनी नाली कचरा जास्त जमला होता. आणि तो साफ करण्यासाठी कचरा काढला असे सांगितले. सोबतच काढलेली फरशी तेथेच लावली तेही सांगितले. पण त्या दोन जणांनी डोपेवाडला विटकरीने त्याच्या पाठीत व छातीवर मारहाण केली. डोपेवाडच्या तक्रारीवरुन देगलूर पोलीसांनी गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपअधिक्षक अशोक विरकर हे करीत आहेत. 
 

    Tags