logo

नांदेड, नांदेड हैद्राबाद महामार्गावर नायगाव तालुक्यातील देगाव शिवारात वाहेगुरु धाब्याजवळ रोडवर उभ्या ट्रकवर नांदेड हुन देगलूर कडे  जाणारी खाजगी बस आदळल्याने भीषणअपघात झाला.अपघातात एकूण 11  जण जखमी असून त्यातील काही गंभीर जखमी, तर काही किरकोळ जखमी आहेत जखमींना पुढील उपचारार्थ नांदेडला पाठविले चे समजले. सदर अपघात मंगळवारी सायंकाळी 5ते 5.30 च्या दरम्यान घडला.

अधिक वृत्त असे कि नांदेड हुन देगलूर कडे भरधाव वेगात निघालेली( ट्रॅव्हल्स )खाजगी बस क्र.एम .एच 24 ए 3166 च्या चालकाचा ताबा सुटल्याने घुंगराळा देगाव दरम्यान असलेल्या वाहेगुरु धाब्याजवळ उभ्या ट्रॅक वर जाऊन धडकली. सदर अपघात चालकाच्या चुकी मुळे झाल्याचे प्रत्यक्ष दर्शींने सांगितले. अपघातात जखमीना नायगाव ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून नांदेड येथे शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले.जखमीची नावे अशी मीनाक्षी श्रीनिवास पवार 27 रा.गोळेगाव,साईनाथ बालाजी चोंडे 25 रा शेळगाव छत्री, आशपाक शेख 30 रा.नांदेड,योगेश आत्माराम सालेगाये 24 शेळगाव छत्री, बळीराम गणगाराम गुजुरे 36 रा.हिंगणी, माधव बंडेवार 30 हिंगणी,प्रीतम जाधव 20 आखाडा बाळापूर , संतोष गणपती गोनेवाड 24 खुपसर वाडी ,आनंदा नागोराव शेळगाव 25 खुपसर वाडी, आरती आत्माराम पात्रपले 2 खुपसर वाडी ,सुरेखा बालाजी वानखेडे 44 हे होत. अपघात झाल्या नंतर जखमी पैकी एकाने भ्रमणध्वनी वरून प्रा.रवींद्र चव्हाण याना संपर्क केला तात्काळ चव्हाण व बाबासाहेब  शिंदे  यांनी घटनास्थळी धाव घेऊन नायगाव च्या डॉं.आश्विनी आनेमवाङ, खाजगी डॉं. संघटनेचे सर्व डॉं कटर, यांना संपर्क केला तात्काळ सर्व वैद्यकीय मंडळींनी तात्काळ रुग्णालयात येऊन जखमी वर प्राथमिक उपचार केले व गाडी 108 ने गंभीर  6 जखमींना नांदेड येथे रवाना केले. यावेळी कुंटुर ठाण्याचे सपोनि विवेकानंद पाटील व सर्व कर्मचारी घटनास्थळी हजर झाले

    Tags