logo

BREAKING NEWS

मुक्रमाबाद परीसरात विविध ठिकाणी महात्मा बसवेश्वर जयंती मोठय़ा उत्साहात साजरी

संपूर्ण मानव जातीचे भुषण,  नवविचांराचे प्रवर्तक,  परीवर्तनाचा महामेरू,  जे आजही शक्य झालेली नाही असे समग्र क्रांती 12 व्या शतकात घडवुन आणणारे, स्री-पुरूष समानतेचे जनक क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. 

मंडळ अधिकारी कार्यालय
----------------------
येथील समतानायक विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त येथील मंडळ अधिकारी आर.  पद्दमवार यांच्या हस्ते बसव प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.  यावेळी मुक्रमाबाद विभागाचे तलाठी चव्हाण सर, सदाशिव बोयवार, बालाजी पसरगे, बाबा सय्यद, हेमंत खंकरे, पत्रकार संतोष हेस्से यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. 

खडकेश्वर विरभद्र मंदिर
--------------------
लिंगायत धर्माचे संस्थापक, समतेचे नायक महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त येथील विरभद्र  मंदीरात सकाळी 10 वाजता मंदिराचे पुजारी बसुप्पा वंटगीरे यांच्या हस्ते बसव ध्वजारोहण करण्यात आले.  यावेळी सुभाषप्पा बोधने , पंचप्पा मठदेवरू, संतोष बगारे , नागनाथ थळपत्ते, मुरली होमकर यांच्यासह शेकडो बसवप्रेमी उपस्थित होते..

शहिद चंद्रकांत खंकरे माध्यमिक शाळा रावी
----------------------
येथील खंकरे शाळेतील स्री-पुरूष समानतेचे जनक महामानव महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठय़ा उत्साहात विद्यार्थी विद्यार्थींनी साजरी केली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक आर.  रायजी यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी एम. वाघमारे यांनी विश्वगुरू महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित विद्यार्थी  व उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. शाळेचे डी. गंदगे, सि.एम. बिरादार , आर. जे. बिराजदार,  शिवराज मैलारे, गिरमाजी सर,  गाजले मामा, नागनाथ खंकरे, विठ्ठल मामा यांची उपस्थिती होती.

ग्रामपंचायत कार्यालय मुक्रमाबाद 
-----------------------
येथील क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायत कार्यालयात ग्रा.पं.स. हेमंत खंकरे यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सरपंच पती शिवराज आवडके , बालाजी बोधने, निखिल कोयलकोंडावार, अमर देशमुख, बालाजी पसरगे, मन्मथ गोकुळे, पत्रकार संतोष हेस्से, 
यांच्यासह गावकर्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले 

मयुरी कॉम्प्युटर सेंटर
 -----------------
येथील बहुजनांचे नायक , जगत्तज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचे पुजन मयुरी कॉम्प्युटर सेंटरचे संतोष बोधने यांच्या हस्ते करण्यात आले. बसव जयंतीचे औचित्य साधून चिमुकल्या विद्यार्थ्यांना मोफत  एकदिवसीय संगणक प्रशिक्षण देण्यात आले.  यावेळी संतोष गंदिगुडे, सुनिल रोट्टेवाड, निखिल कंगठीकर, यांच्यासह विद्यार्थी , पालक वर्ग मोठय़ा प्रमाणात सहभागी होते. .

कै.शिवमुर्तीप्पा मळगे प्राथमिक शाळा 
----------------------
येथील महामानव महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त शाळेचे मुख्याध्यापक सुर्यवंशी सर यांच्या हस्ते तैलचित्राचे पुजा  विधी व पुष्पमाला अर्पण करून अभिवादन केले. यावेळी विद्यार्थी , शिक्षक वर्गांना शाळेचे शिक्षक चोपडे सर यांनी महात्मा बसवेश्वर समजावुन सांगितले यावेळी गिरी सर, वरगिंडे सर, मेहरकर मॅडम, नरबाग मॅडम, काळे सर उपस्थित होते.

दापका येथे बसव जन्मोत्सव उत्सवात साजरी
----------------------
मौजे.  दापका (गुं) येथे महात्मा बसवेश्वर जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष बालाजी दरडे यांच्या हस्ते सकाळी 8.30 वाजता जगत्तज्योती महात्मा बसवेश्वर यांच्या अश्वरूढ पुतळ्यास पुष्पहार घालून  अभिवादन करण्यात आले. व सायंकाळी पाच वाजता भव्य मोटारसायकल रॅली काढुन दापका नगरी पुर्ण 'बसवमय' वातावरण निर्माण झाले होते. नंतरी रात्री 8 वाजता मुखेड मठाचे मठाधिपती 108 विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचे आशिर्वचन झाले.व महात्मा बसवेश्वर यांनी मानव जातीतच देव शोधला , आपल्या कायकातचं देव  आहे असे 12 व्या शतकात महात्मा बसवण्णा सांगितले 
अश्या अनेक विषयांवर शिवाचार्य महाराजांनी दापका वासियांना मार्गदर्शन केले.  

बसव जन्मोत्सव समितीच्या वतीने महाप्रसाद वाटप करण्यात आले. या प्रसंगी मुखेड पंचायत समिती माजी सभापती व्यंकटराव पाटील दापकेकर व माजी उपसभापती सुभाष पाटील दापकेकर , भाजपाचे तालुका सरचिटणीस बालाजी बलशेटवार , डॉ. बालाजी झेटकोडे, अशोकराव घाडगे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गुरूनाथ दरडे, ज्ञानेश्वर पाटील,  नागेश गोपनर, गजानन देबडवार, बाबुराव घोडगे, नागनाथ दरडे, मनोज घोंगडे, माधव शिरोमणी , बालाजी मादरडे, सिद्राम(पप्पू) घोंगडे, संगम घोंगडे, आनंद भाटे, गोविंद गव्हाणे , बालाजी सोलापुरे, बस्वराज दरडे, आदिंनी परीश्रम घेऊन बसव जन्मोत्सव सोहळा कार्यक्रम शांततेत पार पाडले.                  
      
शंभु महादेव ग्रुप खडका
-------------------
येथील ग्रुपचे कार्यकर्ते पुढाकार घेवुन विश्वगुरू , लिंगायताचे दैवत महात्मा बसवेश्वर यांच्या जयंती निमित्त महाप्रसाद ठेवण्यात आले होते. महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेस पत्रकार संतोष हेसे यांच्या हस्ते पुजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी शंभु महादेव ग्रपचे अध्यक्ष संतोष खंकरे,अमर देशमुख, बालाजी घंटेलवाड,
ग्रा.पं.स. हेमंत खंकरे, वैजनाथ गंदिगुडे, सोमनाथ देवणे,  संजय गोकुळे आदिंची उपस्थिती होती. 

    Tags