logo

नांदेड, देगलूर तालुक्यातील शेवाळा,शेकापूर व सांगवी उमर रेतीघाट बंद करण्यासह त्यांची ईटीएस मशिनद्वारे मोजणी करून दोन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश तहसिलदार देगलूर यांना जिल्हाधिकारी,नांदेड यांनी दिले असून सदर रेतीघाटांसह जिल्हाभरातील निर्गत रेतीघाटांवरिल नियमबाह्य रेती उपसा, उत्खनन व वहातूकीसह साठे प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन कसूर करित असल्याने माहिती अधिकार तपास समिती, महाराष्ट्र जिल्हाभरात तिव्र जनांदोलन उभारण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

नांदेड जिल्ह्यातील निर्गत रेतीघाटांसह नदीपाञांतून नियमबाह्यपणे होत असलेल्या रेती उत्खनन, वहातूक व रेतीसाठ्यांना प्रतिबंध करण्यांसह सदर रेतीघाट व साठ्यांचे सर्व्हेक्षण करूण लिलाव करण्यासह शासन महसूल वाढवून दोषी जिल्हा खनिकर्म अधिकारी सोखी व संबधितांवर कायदेशिर कारवाई करावी तसेच,जनहितांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी माहिती अधिकार तपास समिती, महाराष्ट्र च्यावतिने संस्थापक अध्यक्ष दत्ताञय अनंतवार,प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे, किरण वाघमारे व मारोती कांबळे यांनी जिल्हाधिकारी,नांदेड कार्यालयासमोर दि.12 एप्रिलपासून कार्यालयीन वेळेत बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केले आहे.जिल्हाधिकारी,नांदेड स्तरावरून संबधित विभागप्रमुख यांना आदेशासह तब्बल चार स्मरणपञे तर रेतीबाबत जिल्ह्यातील सर्वच उपविभागीय अधिकारी यांना आदेशासह स्मरणपञे दिल्यानंतरही अनुपालन नसल्याने वरिष्ठांचा आदेश व सातत्याने पाठपुराव्यानंतरही संबधितांवर कारवाईऐवजी जिल्हा प्रशासन दोषींना पाठीशी घालीत असल्याने माहिती अधिकार तपास समिती, महाराष्ट्र व माहिती अधिकार महिला समिती, महाराष्ट्र च्यावतिने जिल्ह्याभरात आंदोलन सुरू करण्यांत आले असून त्याच अनुषंगाने दि.11 मे रोजी नागणी (ता.बिलोली) रेतीघाटावर बेमुदत उपोषण धरणेसह नियमबाह्य रेती वहातूक वहानांच्या हवाछोडो आंदोलनावेळी आश्वासनानंतरही कारवाई नसल्याने दि.29 मे रोजी उपविभागीय अधिकारी, देगलूर कार्यालयासमोर प्रदेशाध्यक्षा सविताताई चप्पलवार यांनी बेमुदत उपोषण व धरणे आंदोलन सुरू केल्यानंतर वरिष्ठांच्या आदेशानंतरही तब्बल चौथ्या दिवशी जिल्हाधिकारी,नांदेड यांना देगलूर तालुक्यातील रेतीघाट बंद करण्याची शिफारस केल्याचे लेखी पञ उपविभागीय अधिकारी व्हि.एल.कोळी व तहसिलदार महादेव किरवले यांनी दि.1 जून रोजी दिल्यानंतर त्याठिकाणचे उपोषण व आंदोलन तुर्त स्थगित करण्यांत आले होते.माञ तात्काळ कारवाई होत नसल्याने जिल्हाप्रशासनास सदर रेतीघाट कायमचे बंद करून रहाटी (ता.नांदेड), आंतरगांव (ता.नायगांव खै.) तसेच,जिल्हाभरांतील बंद असलेल्या रेतीघाटांवरिल अवैद्ध रेती उपसा,वहातूक व साठ्यांबाबत संबधित तहसिलदार,मंडळ अधिकारी, तलाठी व संबधितांवर कायदेशिर कारवाईचीही मागणी करण्यांत आली होती.

दरम्यान देगलूर तालुक्यातील शेवाळा,शेकापूर व सांगवी उमर रेतीघाटांची ईटीएस मशिनद्वारे मोजणी करून कोणत्याही परिस्थितीत दोन दिवसांच्या आंत अहवाल सादर करावा तसेच,मोजणी अहवाल येईपर्यंत सदर रेतीघाट बंद करावेत असे आदेश जिल्हाधिकारी,नांदेड यांनी तहसिलदार,देगलूर यांना दि.7 जून रोजी दिले आहेत. महत्वाचे म्हणजे सदर रेतीघाट कायमचे बंद करणे तसेच,नियमबाह्य रेती वहातूक व साठेबाबत तात्काळ कारवाई होणे अत्यावश्यक असतांनाही तहसिल व जिल्हाप्रशासन केवळ कागदोपञी सोपस्कार पुर्ण करित जणू एकप्रकारे रेतीमाफियांसह महसूलच्या संबधित अधिकारी व कर्मचारी यांना पाठीशी घालीत असून असाच प्रकार जनहितांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत होत असल्याने दोषींसह त्यांना पाठीशी घालणारेंवर कारवाईंसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बेमूदत उपोषण व धरणे आंदोलना पाठोपाठ जिल्हाभरात तिव्र जनांदोलन उभारणार असल्याचा निर्धार समितीचे संस्थापक अध्यक्ष दत्ताञय अनंतवार,प्रदेश कार्याध्यक्ष लक्ष्मणराव मा.भवरे,किरण वाघमारे, मारोती कांबळे, माधव मारकवाड, शे.शब्बिर,संतोष नातेवार,महिला समितीच्या सविताताई चप्पलवार, लक्ष्मीताई वाघमारे, हरप्रितकौर पुजारी यांनी व्यक्त केला आहे.

    Tags