Breaking news

खंडोबा यात्रेनिमित्त भव्य पशुप्रदर्शन, पालखी सोहळा, व जंगी कुसत्याचे आयोजन

माचनुर/बिलोली(शिवराज भायनुरे) मौ. माचनुर ता बिलोली येथे दरवर्षी प्रमाणे यात्रेनिमित्त गावात अखंड हारीनाम सप्ताह दि. 06-12-2016 ते 13-12-2016 पर्यंत भव्य पशुप्रदर्शन, खंडोबा देवाची पालखी सोहळा, व जंगी कुसत्या ठेवण्यात आले आसुन या सप्ताहाचे सुरवात 06 डिसेंबर रोजी ह.भ.प.गंगाधर महाराज पांचाळ यांच्या कीर्तनाने सुरवात झाली आहे.

शंकर महाराज मसगेकर, व्यकंट महाराज एकलारकर बालाजी महाराज नांदेडकर, त्र्यंबक स्वामी नांदगावकर, सूर्यकांत महाराज होनवडजकर, परमानंद महाराज दाबगेकर यांचे किर्तन तर दि. 13 डिसेंबर रोजी ह.भ.प.योगेश महाराज वसमतकर यांचे काल्याचे किर्तन व महाप्रसाद तसेच भव्य पशुप्रदर्शन व सं ठीक 8.00 वाजता श्री खंडोबा देवाची पालखी मिरवणूक निघणार आहे. दिं 14 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता जंगी कुसत्या या कुसत्याचे बक्षिस 10 रुपये पासुन ते शेवटची कुस्ती 5001 रुपयांची आहे तर द्वितीय बक्षिस 2500 रुपयांची व तृतीय बक्षिस 2100 रुपयांची होणार व या खंडोबा देवाची यात्रा भरवली जाणार असून या यात्रेनिमित्त अखंड हारीनाम सप्ताह, भव्य पशुप्रदर्शन, पालखी सोहळा व जंगी कुसत्याचे आयोजन करण्यात आली असून परिसरातील पैलवान, पशुपालक व भाविकभक्तासंह यात्रेकरुनी या यात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन मौ. माचनुर येथील सरपंच, उपसरपंच, ग्रा. पंचायत. सदस्य, पोलिस पा. व तंटामुक्त अध्यक्ष व समस्त गावखरी मंडळीकडुन करण्यात आली आहे

Related Photos