Breaking news

सगरोळीतील बँक आँफ महाराष्ट्र शाखेस खातेदारांनी ठोकले ताळे

बिलोली(प्रतिनिधी)येथिल बँक आँफ महाराष्ट्र शाखेत दिवसेंदिवस नवनवीन प्रकरणे समोर येत असून ही बँक सध्या परिसरात चर्चेचा विषय बनली आहे , गेल्या आठ दिवसापुर्वीच एकाच खातेचे एटीम कार्ड , पासबुक , दोन ग्राहकांना दिले होते तर दररोज च्या बँकेच्या कारभाराला वैतागून परिसरातील ग्राहक सदरील शाखेस कर्मचारी आत असताना बाहेर ताळे ठोकून बाहेर बसले होते, दिवसेंदिवस चालत असलेल्या अशा अनागोंदी कारभाराने परिसरात बँकेच्या आर्थिक व्यवहारावर चांगलीच चर्चा रांगत असल्याचे दिसते.

सगरोळी हे तालुक्यातील मोठे व्यापारी केंद्र असलेले मध्यवर्ती ठिकाण आहे. येथे परिसरातील बोळेगाव, कार्ला , येसगी , दौलतापूर , हिप्परगा थडी , शिंपाळा , रामपूर , केसराळी , शेवाळा , शेळगाव आदी गावातील नागरिकांसाठी महाराष्ट्र बँक व नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक ही दोन बँका आहेत परंतु नांदेड जि. मध्यवर्ती बँकेतून नोटा बदलण्याचा व्यवहार चालू नसल्याने सर्व खातेदारांनी बँक आँफ महाराष्ट्र व पोस्ट कार्यालयात गर्दी करीत आहेत.

सगरोळी येथे असलेल्या महाराष्ट्र या बँकेत जवळपास बारा हजार खाती असून येथेच सर्व आर्थिक व्यावहार चालतात. या शाखेत काही दिवसापुर्वीच शिंपाळा येथिल गजानन गंगाराम गरबडे ( 25030680738 ) हे खाते असून, सदरील बँकेतील कर्मचाऱ्यांनी सदरील अकाउंट नंबर दोन ग्राहकास दिले व त्याचे पासबुक व एटीएम सुध्दा दिले होते, सदरील बाब खातेदाराच्या निदर्शनास येताच बँक प्रशासन तात्काळ दुरूस्ती केले मात्र असे गैर प्रकार या शाखेत किती असतील यावर प्रश्न उपस्थित होत आहेत. तर आर्थिक अडचणी , पैशाच्या तुटवडा या कारणाने या बँकेतील कर्मचारी सतत बँक बंद ठेवत असल्याने परिसरातील नागरिकांना आर्थिक अडचण निर्माण होत आहे व या बँकेचे सततच्या गैरकारभाराला वैतागून परिसरातील ग्राहक सदरील शाखेस कर्मचारी आत असताना बाहेर ताळे ठोकून बाहेर बसले होते, वरिष्ठांनी सदरील बँक शाखेच्या व्यवहारावर लक्ष घालावे अशी मागणी परिसरातील बँक ग्राहक करत आहेत. काही दिवसांपासून येथिल बँकेतून सुरळीत व्यवहार मिळत नसल्याने परिसरातील बँक ग्राहक चांगलेच वैतागले असून दिवसेंदिवस चालत असलेल्या बँकेच्या या अनागोंदी कारभाराने सध्या ही बँक चर्चेचा विषय बनली आहे. नविन चलन कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने चलनाचा तुटवडा भासत असून ग्राहकांना आर्थिक व्यवहार करण्यासाठी अनेक अडचणी येत आहेत , त्यामुळे ग्रामीण भागातील बँकेच्या ग्राहकांची संख्या लक्षात घेऊन योग्य प्रमाणात चलन उपलब्ध करून दिल्यास ग्राहकांना व बँकांना अडचणी येणार नाही.

सगरोळी येथिल शाखेत माझे गेल्या अनेक वर्षापासून खाते आहे. माझेआज 80 वर्ष वय असून सदरील बँकेत पैशासाठी सतत फे-या माराव्या लागत आहेत मात्र शाखाधिकारी किंवा कर्मचारी ज्येष्ठांकडे विचारत सुध्दा नाहीत यामुळे माझ्यासारख्या अनेक ग्राहकांना त्रास सहन करावा लागत आहे. अशी अडचण राजेन्ना सुरकुटलावार यांनी व्यक्त केली.

सगरोळी येथिल ही बँक नेहमीच चर्चेचा विषय ठरत असून या बँकेतील अधिकारी व कर्मचारी चलन तुटवड्याच्या कारणाने बँक दुपारनंतर बंद करत आहेत यामुळे सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत असून या शाखेतील रक्कम गावातील धनदांडग्यांना मोठ्या प्रमाणात दिली जात आहे. वरिष्ठांनी सदरील शाखेच्या कारभारावर लक्ष घालून सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवावेत. अशी रास्त अपेक्षा शिंपाळा येथील खातेधारक माधव जाधव यांनी केली.

सगरोळी येथिल शाखेतून वेळेवर पैसे मिळत नाहीत व महिलांसाठी स्वतंत्र काऊंटर उपलब्ध केले नाही. यामुळे ग्रामीण भागातील महिला ग्राहकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. अशी प्रतिक्रिया सगरोळी येथील महिला ग्राहक वैदाबी पिंजारी यांनी दिली.

Related Photos