Breaking news

एकाच रात्री चोरटयांनी पाच घरे फोडली; दीड लाखांचा ऐवज लंपास

नांदेड(खास प्रतिनिधी)मरखेल पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोणी आणि दावणगीर या दोन गावात चोरटयांनी एकाच रात्री पाच घरे फोडून 1 लाख 42 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला आहे.

मौ लोणी ता.देगलुर येथील शांमलबाई भ्र.नागनाथ डब्बे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 डिसेंबर 2016 च्या रात्री 1 ते पहाटे 5 वाजे दरम्यान त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कोणीतरी चोरटयांनी घरातील 5 ग्राम सोन्याचे मणी 15 हजार रुपयांचे आणि 15 तोळे चांदी 7 हजार रुपयांची असे एकूण 26 हजार 500 रुपयांचे किमती साहित्य चोरून नेले आहे. मरखेल पोलिसांनी अज्ञात चोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास सहायक पोलीस उप निरीक्षक कुंभारे हे करीत आहेत. मौ. दावणगीर देगलर येथील पाशुमियॉं जबारसाब शेख यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 19 डिसेंबर 2016 च्या रात्री 2 ते 2.30 दरम्यान त्यांच्या आणि गणपतराव माधवराव बामणे यांच्या घरांचे कुलूप तोडून आतील सोन्या चांदीचे दागिने तसेच इतर दोन जणांचे घर फोडून चोरटयांनी त्यातील रोख रक्कम चोरली आहे.या चार घरांमधून चोरी झालेल्या ऐवजाची किंमत 1 लाख 16 हजार रुपये आहे. या पाच ठिकाणी झालेल्या चोऱ्यांचा एकच गुन्हा मरखेल पोलिसांनी दाखल केला आहे.तपास सहायक पोलीस उप निरीक्षक कराड हे करीत आहेत.

Related Photos