सजाबाई गणपती शिंदे यांचे दु:खद निधन

बिलोली(प्रतिनिधी)दुगाव ता. बिलोली येथील रहिवाशी सजाबाई गणपती शिंदे यांचे गुरूवार दि. 22 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता दु:खद निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय 87 होते. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवार दि. 23 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 वाजता दुगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगी, तीन मुले, नातू, पनतू असा परिवार आहे. रणजीत शिंदे गुरूजी यांच्या त्या आई होत. त्यांच्या निधनाने गावात शोककळा पसरली आहे.

Related Photos