केस मागे घेण्याच्या कारणावरून 60 वर्षीय शेतकऱ्याचा खून करून प्रेत जाळले

नांदेड(प्रतिनिधी)कोर्टातील केस मागे घेण्याच्या कारणावरून एका 60 वर्षीय शेतकऱ्याचा खून करून त्यांचे प्रेत जाळण्यात आल्याची घटना घडली आहे.

चंदर जळबा यदलवाड रा.डोनगाव,ता.बिलोली यांनी दिलेल्या तक्रारीनुसार दिनांक 5 जानेवारी 2017 ते 6 जानेवारी 2017 च्या रात्री गंगाराम लिंगन्ना पैलवार (60) यांना कोर्टातील केस मागे घेण्यासाठी शेतात एकटे गाठून मारून टाकले आणि पुरावा नष्ट करण्यासाठी ते प्रेत जाळून टाकले.बिलोली पोलिसांनी भादवीच्या कलम 302,201 नुसार गुन्हा दाखल केला आहे.तपास पोलीस निरीक्षक जी.आर.फसले हे करीत आहेत.त्यांचा मोबाईल क्रमांक 9422689115 असा आहे.

वाहतूकनगर भागात 70 हजारांची चोरी
----------------------
घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याचे पाहून चोरटयांनी त्यावर हाथ साफ केल्याचा प्रकार वाहतूकनगर,हनुमानगड रोडवर भागात 5 - 6 जानेवारीच्या रात्री घडली आहे.

श्रीमती सिंधु श्रीपतराव राठोड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 5 - 6 जानेवारीच्या रात्री ते आणि त्यांचे सर्व कुटुंबीय लातूर येथे आपल्या मुलीच्या गावी गेली असता कोणीतरी अज्ञात चोरटयाने त्यांच्या घराचे कुलूप कोंडा तोडून आत प्रवेश करुन घरातील सोन्याचांदीचे दागीने व रोख रक्कम 10 हजार रुपये असा एकूण 70 हजार रुपयांचा घरातील वस्तू चोरुन नेल्या आहेत.या बाबत विमानतळ पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.तपास सहायक पोलीस निरीक्षक संजय गायकवाड हे करीत आहेत.त्यांचा मोबाईल क्रमांक 9923028799 असा आहे.

Related Photos