रोखविरहित व्यवहार करतांना विश्‍वासार्ह कार्याची गरज -गोविंद मुंडकर

नांदेड(प्रतिनिधी)रोखविरहित व्यवहार करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची आणि विश्‍वासार्ह कार्याची गरज आहे. असे प्रतिपादन आर्थिक विश्‍लेषक तथा सल्लागार गोविंद मुंडकर यांनी केले. ते रोखविरहित व्यवहार ही काळाची गरज या विषयावर बिलोली येथील मार्गदर्शन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मारोतराव भवरे, संतोष बंडे, प्रभाकर स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती.

मुंडकर पुढे असेही म्हणाले की, भारत सरकारने रोखविरहित व्यवहाराचा कठोर निर्णय घेतला आहे. हा निर्णय कुणाला पसंद असो अथवा नसो त्याची अंमलबजावणी करणे काळाची गरज झाली आहे. रोखविरहित व्यवहार करण्यासाठी नेटबँकींग, मोबाईल बँकींग आदी बाबी आता समजुन घेण्याची गरज निर्माण झाली आहे. रोखविरहित व्यवहार करण्याची ईच्छा नसली तरी ती करणे आता काळाची गरज झाली आहे. ते पुढे असेही म्हणाले की, रोखविरहित व्यवहार करण्यासाठी एकमेकांच्या सहकार्याची नितांत गरज आहे. ज्यांना रोखविरहित व्यवहार करण्यासाठी ते ज्ञान अवगत झाले त्यांनी इतरांना सांगण्याची गरज आहे. यात विश्‍वासर्हता ठेवणे खुप गरजेचे आहे. फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या बाबी जशा प्रशिक्षणाशिवाय लोकांना अवगत झाल्या. तशा रोखविरहित व्यवहाराच्या बाबी सुध्दा निश्‍चितच अवगत होतील. यावेळी आकाशवाणीचे कार्यक्रमाधिकारी भिमराव शेळके यांनी गोविंद मुंडकर आणि सु.मा.कुलकर्णी यांची घेतलेली मुलाखत उपस्थितांना ऐकविण्यात आली. यामुळे रोखविरहित व्यवहाराच्या विषयीची भिती कमी झाल्याचे उपस्थित श्रोत्यांनी आपल्या मनोगतात नमुद केले.

Related Photos